रत्नागिरी ः आपत्तीकाळात आपदामित्रांची भूमिका महत्वाची
फोटो ओळी
-rat१७p३७.jpg- KOP२३L७६२७५
रत्नागिरी ः आपदा मित्रांच्या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणस्थळी भेट देऊन विचारपूस करताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह.
आपत्तीकाळात आपदामित्रांची भूमिका महत्वाची
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह ; प्रशिक्षण शिबिराला भेट
रत्नागिरी, ता. १७ ः नैसर्गिक आपत्तीसह इतर सर्व आपत्तींमध्ये आणि संभाव्य आपत्तीकाळात आपदामित्रांची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असे मत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांनी केले.
येथील पोलिस मुख्यालय परिसरात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणअंतर्गत सुरू असलेल्या आपदामित्र प्रशिक्षण शिबिरास भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नवी दिल्ली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपदामित्र बॅच क्र. २ मध्ये जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी भेट देऊन आपदामित्र प्रशिक्षणाची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी यांनी पूर, दरड कोसळणे, भूकंप, चक्रीवादळासारख्या आपत्तींचा पूर्वानुभव आहे. जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या घटनेवेळी तातडीने शोध व बचावकार्य विविध विभागांमार्फत राबवण्यात येते व या वेळी आपदामित्रांची भूमिका महत्वाची असल्याचे नमूद केले.
जिल्हा आपती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, नागरी संरक्षण दल सहाय्यक उपनियंत्रक लहू माळी , रत्नागिरी, जिल्हा नियंत्रण कक्ष सहाय्यक अनंत कदम, मुख्य प्रशिक्षक बिमल नथवानी, अनिल शेलार, हनुमान चौधरी व ज्योती शेट्टी हे उपस्थित होते. १२ ते २३ जानेवारी या कालावधीत ५३ स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
चौकट-
आपदा सखींसाठी पुढील बॅचमध्ये प्रशिक्षण
पुढील बॅचमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनात काम करण्यास इच्छुक १८ ते ४० वयोगटातील एकूण १०० मुलींची निवड करून त्यांच्यासाठी आपदा सखींसाठी तिसरी बॅच आयोजित करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.