.म्हणून एसटी चालक-वाहक मुरडतात नाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

.म्हणून एसटी चालक-वाहक मुरडतात नाक
.म्हणून एसटी चालक-वाहक मुरडतात नाक

.म्हणून एसटी चालक-वाहक मुरडतात नाक

sakal_logo
By

rat१७३२.txt

(पान ३ साठी, अॅंकर)


चालक वाहकांचा एसटीतच मुक्काम

वस्तीच्या १६ ठिकाणी निवासाच्या सुविधा नाही ; गैरसोयीसह भत्ताही अत्यल्प

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः वस्तीच्या एसटी गाड्यांवरील चालक-वाहकांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रत्नागिरी विभागातील वाडीवस्तीवर जाणाऱ्या गाड्यांपैकी १६ ठिकाणी अद्याप त्यांच्या निवासाची व्यवस्था नाही. त्यामुळे चालक वाहकांना एसटीतच मुक्काम करावा लागतो. गैरसोयीमुळेच चालक रात्री वस्तीची गाडी घेऊन जाण्यासाठी नाक मुरडतात. त्यात मिळणाऱ्या भत्त्यापेक्षा होणारा खर्चच अधिक आहे. त्यामुळे वस्तीची गाडी घेऊन जाणे म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, अशीच गत झाली आहे. त्यामुळे चालक-वाहकांची भत्ता वाढवून देण्याची मागणी आहे.

रत्नागिरी राज्य परिवहन महामंडळाची एसटी वाडीवस्त्यांवर पोहोचल्याने ग्रामीण भागाची ती जीवनवाहिनी ठरली आहे. रत्नागिरी विभागात २२० गाड्या रात्रवस्तीला वाडीवस्तीवर जातात. त्यापैकी अनेक ठिकाणी ग्रामपंचात किंवा अन्य ठिकाणी चालक-वाहकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. या गावांमध्ये रात्री उशिरा येण्यासाठी किंवा सकाळी लवकर जाण्यासाठी गावातील प्रवाशांना या गाड्यांचा फायदा होतो; परंतु अजूनही या गावांपैकी १६ ठिकाणी अद्याप चालक- वाहकांच्या निवासाची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे चालक वाहकांना एसटीतच मुक्काम करावा लागतो. गैरसोयीमुळेच चालक रात्री वस्तीची गाडी घेऊन जाण्यासाठी नाखुश असतात. रात्रवस्तीची गाडी घेऊन जाणाऱ्या चालक, वाहकास ७५ ते १०० रुपये भत्ता दिला जातो; मात्र सुविधा नसल्याने गैरसोसोयीना तोंड द्यावे लागते. महागाईच्या जमान्यात चहा, नाश्ता, जेवणाचे दर वाढले आहेत. त्यामुळे मिळणारा भत्ता अपुरा ठरतो. प्रत्यक्ष १५० ते २०० रुपये खर्च होतो. एसटी प्रशासना महागाईचा विचार करून वस्तींच्या गाड्यांसाठी असणाऱ्या भत्त्यामध्ये वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
--
चहा-पाण्याचा खर्चही निघेना
महागाईमुळे चालक वाहकांना चहा १० ते १५ रुपये दराने विकत घ्यावा लागतो. जेवणाचा डब्यासाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे महागाईत खर्च परवडत नसल्याने भत्ता वाढवून देण्याची मागणी होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे
---
कोट
आम्ही गैरसोयींचा सामना करत थंडीत कुडकुडत प्रवाशांना सेवा देत आहे. आम्ही एसटीतच रात्र घालवतो. तुटपुंज्या भत्त्यात परवडत नसल्याने भत्त्याच्या रकमेत वाढ करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
-सुरेश कदम, एसटी कर्मचारी
--
चौकट-
वस्तीच्या गाड्यांची तालुकानिहाय बस संख्या

मंडणगड*११
दापोली*१५
खेड*३५
चिपळूण*२४
गुहागर*२२
देवरूख*२८
रत्नागिरी*४०
लांजा*१७
राजापूर*२८