शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास पडवे-माजगाव येथे प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास पडवे-माजगाव येथे प्रतिसाद
शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास पडवे-माजगाव येथे प्रतिसाद

शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास पडवे-माजगाव येथे प्रतिसाद

sakal_logo
By

swt1731.jpg
76324
पडवे-माजगावः शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास
पडवे-माजगाव येथे प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ः पडवे-माजगाव येथे आज आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी जनजागृती, किसान क्रेडीट कार्ड, काजू मोहोर व पीक संरक्षण असा तिहेरी उद्देश ठेवून मंडळ कृषी अधिकारी बांदा व ग्रामपंचायत पडवे-माजगाव यांच्यावतीने शेतकरी मेळावा झाला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी बनकर यांनी पौष्टिक तृणधान्य, पिकांचे आहारातील महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या पाककला कृतींची स्पर्धा घेण्याबाबत उपस्थित महिलांना आवाहन केले. मंडळ कृषी अधिकारी भुईंबर यांनी सेंद्रिय शेती प्रकल्प, मसाला पीक लागवड, मग्रारोहयो फळपीक लागवड याविषयी चर्चा व मार्गदर्शन केले. काजू मोहोर व पीक संरक्षण याबाबत कृषी पर्यवेक्षक अजमुद्दीन सरगुरू यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे यांनी केले. आभार अतुल माळी यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद पडवे-माजगाव शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तृणधान्य पिकाचे फलक हाती घेऊन प्रभात फेरीव्दारे केली. नागरिकांनी आहारामध्ये अधिकाधिक पौष्टिक तृणधान्यांचा वापर, रब्बी क्षेत्र विस्तार याबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. यावेळी सरपंच नयना देसाई, उपसरपंच प्रज्ञा देसाई, पोलिस पाटील अरविंद देसाई, विलवडे कृषी सहाय्यक श्रीमती वसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, गट संयोगिनी यांच्यासह एकूण ७६ ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.