शिक्षक महासंघाचे कार्य गौरवास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक महासंघाचे कार्य गौरवास्पद
शिक्षक महासंघाचे कार्य गौरवास्पद

शिक्षक महासंघाचे कार्य गौरवास्पद

sakal_logo
By

76436
सातार्डा ः खासगी महासंघाचा वार्षिक स्नेहमेळाव्यात विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना मान्यवर.

शिक्षक महासंघाचे कार्य गौरवास्पद

शुभांगी देशपांडे ः सातार्डा येथे वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात

सावंतवाडी, ता. १८ ः सुजाण नागरिक घडवण्याचे काम आपणासारख्या सर्वांचे आहे आणि ते आपण मनापासून करत आहात. शिक्षक महासंघाला केलेल्या कामाचे फळ नक्कीच मिळेल, असे गौरवोद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षा शुभांगी देशपांडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्यमान्य खासगी शिक्षक महासंघ जिल्हा शाखा सिंधुदुर्गचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच सातार्डा येथे झाला.
यावेळी या वार्षिक स्नेहमेळाव्यामध्ये मानाचा समजला जाणारा (रामचंद्र चौकेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गणपत चौकेकर पुरस्कृत) आदर्श शाळा पुरस्कार खासगी पसंत शाळा भडगाव-सांद्रेवाडी (ता. कुडाळ) या प्राथमिक शाळेला देण्यात आला. तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सरोज परब यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार कणकवली तालुक्यातील खासगी पसंत शाळा असलदे-तावडेवाडी या प्राथमिक शाळेचे शिक्षक शांताराम जंगले यांना देऊन सन्मानित करण्यात आले. योगेश विनायक कसालकर यांच्या स्मरणार्थ विनया कसालकर पुरस्कृत सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सातार्डा-रायाचेपेड येथील खासगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सचला आरोलकर यांना देऊन गौरविण्यात आले. निवृत्त शिक्षकांमधून दिनेश खोत यांना गौरविण्यात आले. याशिवाय गुणवंत शिक्षक पाल्यांना अग्निपंख पुस्तक देऊन सन्मानित केले. माजी शिक्षण विस्तार अधिकारी शुभांगी देशपांडे (होळीकर) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष अरुण कुंभार, सचिव डी. जी. वरक, कार्याध्यक्ष रेनोल्ड भुतेलो, उपाध्यक्षा दर्शना गुळवे, नवनिर्वाचित सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू, माजी सरपंच उदय पारिपत्ये, ग्रामपंचायत सदस्या शर्मिला मांजरेकर, अर्चना धारगळकर, मुंबई येथील सातार्डा मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष महेंद्र मांजरेकर, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख श्रद्धा महाले, माजी केंद्रप्रमुख रवींद्र गवस, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद राऊळ उपस्थित होते. शिक्षक सचिन तुळसुलकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका सचला आरोलकर यांनी आभार मानले.
--
विजेत्यांना दिली बक्षिसे
विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. शिक्षकांसाठी घेतलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम ज्योत्स्ना गुंजाळ, द्वितीय सरिता गोलतकर, तृतीय विभागून सचला आरोलकर, स्वरा राऊळ, उत्तेजनार्थ प्राची बिले, विनया शिरसाट यांनी पारितोषिक पटकावले. संघटनेचे सचिव डी. जी. वरक यांनी प्रास्ताविक केले.