दृष्टी गेली पण अंतर्दृष्टी झाली जागृत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्टी गेली पण अंतर्दृष्टी झाली जागृत
दृष्टी गेली पण अंतर्दृष्टी झाली जागृत

दृष्टी गेली पण अंतर्दृष्टी झाली जागृत

sakal_logo
By

rat१८२.txt

बातमी क्र. .२ (टुडे पान १ अॅंकर)

rat१८p४.jpg-
७६४१४
रत्नागिरी ः व्याख्यान देताना डॉ. मधुसूदन पेन्ना.

दृष्टी गेली; पण अंतर्दृष्टी झाली जागृत

डॉ. पेन्ना; गुलाबराव महाराजानी केले तत्त्वज्ञान चिंतन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः लहानपणी दृष्टी गेल्यामुळे जग बघता आले नाही; परंतु अंतर्दृष्टी जागृत झाली आणि प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे चिंतन केले. महाराजांना अवघे ३४ वर्षांचे लौकिक आयुष्य लाभले. या अल्प जीवनात महाराजांनी १३४ पुस्तके लिहिली. त्यांनी डार्विन व स्पेन्सर यांच्या सिद्धांतावर भाष्य केले. ज्ञानयोग, भक्तियोग, वेदांत, उपनिषदे, मानसशास्त्र, आयुर्वेद, ब्रह्मसुत्रे आदी विषयांवर लिखाण केले. त्यांचा आदर्श घेत जिज्ञासू विद्यार्थ्यांनीही अभ्यास करावा, असे आवाहन कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमालेत ते बोलत होते.

गुलाबराव महाराजांच्या लिखाणाने मी सुद्धा प्रभावित झालो. त्यामुळेच त्यांच्या चरित्र व उपदेशांवर प्रज्ञाचाक्षूसम हे संस्कृत ८५० श्लोकांचे महाकाव्य रचले. त्याला भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कर जाहीर झाला; परंतु हा गौरव केवळ माझा नाही तर तो संत गुलाबराव महाराजांच्या तत्त्वज्ञानाचे असल्याचे सांगितले. गुलाबराव महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडे (लोणी टाकळी) येथे झाला. गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. महाराजांच्या आयुष्यातील काही अनुभवांतून आपणही कार्य करत राहिले पाहिजे, असे डॉ. पेन्ना यांनी सांगितले.
महाराज डोक्यावर पुस्तकांची पेटी घेऊन फिरत. वाचायला येत त्याच्याकडून वाचून घेत आणि ऐकत. जेवढे ऐकत तेवढे त्यांचा पाठ व्हायचे. त्यांना दिव्यदृष्टी होती. बालपणीच त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावरत्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. आर्य हा वंश असून तो बाहेरून भारतात आला हे मॅक्समुल्लरचे व लोकमान्य टिळकांचे मत गुलाबराव महाराजांना मान्य नव्हते, असेही डॉ. पेन्ना म्हणाले.


विद्यार्थ्यांचा सत्कार
या प्रसंगी संस्कृतचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव डॉ. पेन्ना यांच्या हस्ते करण्यात आला. यात (कै.) भा. का. नेने स्मृती पारितोषिक आणि श्रीमती कमला गो. फडके स्मृती पारितोषिक सिद्धी ओगले, प्रीती टिकेकर, मयुरेश जायदे, ऐश्वर्या आचार्य यांना प्रदान करण्यात आले. ललिता शं. घाटे पारितोषिक मयुरेश जायदे, प्रा. पूर्णिमा आपटे स्मृती पारितोषिक मयुरेश जायदे, पं. दा. गो. जोशी स्मृती पारितोषिक प्रियांका ढोकरे व स्वरूप काणे यांना प्रदान केले.