वेंगुर्लेत २२ पासून धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत २२ पासून धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्लेत २२ पासून धार्मिक कार्यक्रम

वेंगुर्लेत २२ पासून धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

वेंगुर्लेत २२ पासून धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः येथील बसस्थानकावरील साई मंदिर देवस्थानचा २६ वा वर्धापन उत्सव २२ व २३ ला विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त २२ ला सकाळी साडेआठला श्री गणेश पूजन व धार्मिक विधी, ९ वाजता शहरातून श्री साई पालखी मिरवणूक, सायंकाळी चारला वडखोल येथील भजनी मंडळाचे भजन, ६ वाजता महाआरती व पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग, २३ ला सकाळी ८ वाजता महारुद्र व जप सांगता, १० वाजता श्री साईबाबा महापूजा, ११ वाजता साईंची महाआरती व महानैवेद्य, दुपारी १२ वाजल्यापासून महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता सिद्धेश्वर महिला भजन मंडळ, खानोली यांचे भजन, ६ वाजता महाआरती, पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता राज्य परिवहन महामंडळ, सिंधुदुर्ग विभाग यांचा प्रथम क्रमांक प्राप्त ‘दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.