Fri, Feb 3, 2023

गिरोडेत शासकीय जागेमध्ये
अतिक्रमण ः राजन गावडे
गिरोडेत शासकीय जागेमध्ये अतिक्रमण ः राजन गावडे
Published on : 18 January 2023, 12:49 pm
गिरोडेत शासकीय जागेमध्ये
अतिक्रमण ः राजन गावडे
तहसीलदार अरुण खानोलकरांना निवेदन
दोडामार्ग, ता. १८ ः गिरोडे येथे शासकीय जमिनीत अतिक्रमण झाल्याचा आरोप करत या प्रकरणी सखोल चौकशी मागणी राजन गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन येथील तहसीलदार अरुण खानोलकर यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गिरोडे गावात रोजगार हमी योजनेचा लाभ उठवून शासकीय जागेत विहीर बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. कागदोपत्री वेगळाच सातबारा दाखवून या जमिनीत हे अनधिकृत विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. विहीर बांधण्यात आलेल्या शासकीय जागेत केळी, नारळ, काजू व इतर बागायती केलेली आहे. याची सखोल चौकशी करून शासकीय जमिनीतील अतिक्रमण काढावे. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.