रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

पान 2 साठी


देव महाविद्यालयात राजमाता जिजाऊंना अभिवादन
रत्नागिरी ः येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची माहिती दिली. कविता वाचनही केले. या वेळी उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला शाखाप्रमुख ऋतुजा भोवड, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन योगिनी बापट हिने केले. अंकिता भातडे हिने आभार मानले.


बुद्धिबळ खेळातील संधीबाबत व्याख्यान
रत्नागिरी ः देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून बुद्धिबळ खेळातील संधी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. यात प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच विवेक सोहनी उपस्थित होते. सोहनी यांनी बुद्धिबळ या खेळातील संधीविषयी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या युवावर्गाला कसे आचरणात आणता येतील या विषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. मला भावलेले स्वामी विवेकानंद व आजची युवापिढी या विषयावर विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत तृतीय वर्ष कला शाखेच्या चिन्मयी पालकर, वैष्णवी बाणे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय तर द्वितीय वर्ष कला शाखेच्या प्रणय गुरव याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव , राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख ऋतुजा भोवड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मयुरेश आंग्रे याने केले. प्रा. मिथिला वाडेकर यांनी आभार मानले.

एसटीतर्फे सुरक्षा सप्ताहात मार्गदर्शन
रत्नागिरी ः रस्ता सुरक्षा व सुरक्षितता अभियानानिमित्त उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे मोटारवाहन निरीक्षक कोराणे, काटकर, मुल्ला यांनी रत्नागिरी एसटी विभागीय कार्यालयाच्या प्रशिक्षण केंद्रात चालक, वाहक इतर कर्मचारी यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले. माहितीदर्शक चिन्हे याचा व अपघात होऊ नयेत या विषयी काळजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले. विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेत्तर यांनीही अपघात कमी होण्याच्यादृष्टीने एसटी विभागीय कार्यालयातर्फे काय काय योजना राबवल्या जातात याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक वाहतूक अधिकारी काव्या पेडणेकर यांनी केले. अभियानानिमित्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, मोटारवाहन निरीक्षक काटकर, कदम यांनीही भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. रा. प. बसथांब्यावर बस थांबवताना योग्य ती काळजी घेऊन बस थांबवण्याबाबतचे मार्गदर्शन केले. घाटरस्ता व सरळ रस्ता, ब्लाईंड रस्ता रा. प. बस चालवताना कशी काळजी घ्यावी या विषयी माहिती दिली. विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी मार्गदर्शन केले.