महेश हातणकरना महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेश हातणकरना महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार
महेश हातणकरना महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार

महेश हातणकरना महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

rat१८p२३.jpg
L७६४५०
गणपतीपुळेः मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पदवीधर शिक्षक महेश हातणकर.

महेश हातणकर यांना पुरस्कार
राजापूर, ता. १८ः शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तालुक्यातील तेरवण येथील जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षक महेश हातणकर यांना आविष्कार सोशल अ‍ॅन्ड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षकगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा सोहळा गणपतीपुळे येथे पार पडला. प्रशालेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करताना त्यांनी शाळेमध्ये अन्य विविध उपक्रमही राबवले आहेत. या उपक्रमांची विविध संस्थांनी दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवले आहे. त्यामध्ये शालेय परिसर विकास प्रकल्पप्रमुख म्हणून २०१०-११ मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक, २०११-१२ मध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून तृतीय पारितोषिक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक म्हणून २०१२-१३ चा पुरस्कार यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त तेरवण शाळा विमा स्कूल पुरस्काराने सन्मानित झाली असून, या उपक्रमासह विद्यार्थी बचत बँक, उत्कृष्ट शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, शैक्षणिक उठाव करण्यामध्येही महत्वपूर्ण योगदान दिले आहे. पहिली ते सातवी परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव, शालेय शिक्षण विषयांवर प्रश्‍नचिन्ह तयार करून त्याचे पुस्तक तयार करून त्याच्या प्रकाशनामध्ये त्यांनी योगदान दिले आहे.