
शाळा बदं पडणार नाहीत याची काळजी घेणे सुरू
rat१८१४.txt
बातमी क्र.. १४ ( पान २ साठी)
rat१८p११.jpg-
७६४०२
रत्नागिरी : हातिस जि. प. शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी महिला ग्रामस्थ, विद्यार्थिनी.
शाळा बदं पडणार नाहीत...
कुमार शेट्ये ; हातिस शाळेच्या शतक महोत्सवाची सांगता
रत्नागिरी, ता. १८ ः हातिस जि. प. शाळेच्या शतक महोत्सवाची सांगता विविध कार्यक्रमांनी झाली. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती कुमार शेट्ये यांनी शाळा बदं पडणार नाहीत याची काळजी घेण्याचे काम आम्ही सुरू केल्याचे सांगितले.
कार्यक्रमात विनायक हातखंबकर यांनी सांगितले, हातिस गाव एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातो. या शाळेला १०० वर्षे झाली आहेत. त्याबद्दल शिक्षकांविषयी ग्रामस्थ कृतज्ञता व्यक्त करत आहेत, याचा अभिमान वाटतो. माजी सरपंच कांचन नागवेकर यांनी पुरामुळे वापरता न येणारी शाळा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून बांधून दिल्याचे नमूद केले. आजी-माजी शिक्षकांचा हृद्यसन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका अनुजा सागवेकर यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी हातिस ग्रामविकास मंडळ, हातिस आणि मुंबईचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर आणि शंतनू नागवेकर, संदीप (मुन्ना) नागवेकर, ऋषिकेश नागवेकर, विजय नागवेकर, जयवंत नागवेकर उपस्थित होते. डॉ. दिलीप नागवेकर यांनी सूत्रसंचलन केले. उपेंद्र नागवेकर, अनिकेत नागवेकर, प्रमोद नागवेकर (मानकरी), बबन नागवेकर, विजय नागवेकर, महेश कीर, रूपेश नार्वेकर, पोलिसपाटील संतोष नागवेकर, बचतगटाच्या महिला आणि ग्रामस्थ त्याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी यांनी महोत्सवासाठी परिश्रम घेतले.