शंभर ट्क्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभर ट्क्के निकाल
शंभर ट्क्के निकाल

शंभर ट्क्के निकाल

sakal_logo
By

rat१८१८.txt

( पान ५ संक्षिप्त )

पावस शाळेचा इंटरमिजिएटचा १०० टक्के निकाल

पावस ः शासकीय रेखाकला परीक्षा २०२२ इंटरमिजिएट ग्रेट परीक्षेत स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर, पावस प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला. १६ जानेवारीला शासकीय रेखाकला परीक्षा २०२२चा इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर प्रशालेतून २१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दरवर्षीची परंपरा राखत यावर्षी ही १०० टक्के निकाल लागला. यामध्ये अ श्रेणीत पार्थ मांडवकर, सानिका मेस्त्री, शार्वेद मेस्त्री, स्वराली पाटणकर आणि पावसकर हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कार्तिक जोशी, श्रवण कमळे, सुजल नमसले, श्रवणी पाटील आणि निधी माने हे विद्यार्थी ब श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले व ११ विद्यार्थी क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक प्रशालेचे कलाशिक्षक संजय भेलेकर व पालकांचे लोकल कमिटीचे अध्यक्ष माधव पालकर आणि सर्व सदस्य अधिकारी तसेच शालेय समितिचे अध्यक्ष संतोष सामंत आणि सदस्य प्रशालेचे मुख्याध्यापक बाबासाहेब माने, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
------------------

rat१८p५.jpg ः
७६४१५
रत्नागिरी ः शेख पिता-पुत्राच्या यशाबद्दल अभिनंदन करताना मान्यवर.

विज्ञान प्रदर्शनामध्ये पिता-पुत्राचे यश

रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्याचे ५०वे तालुका स्तरीय विज्ञानप्रदर्शन कसोप फणसोप येथे नुकतेच झाले. फरहान शेख (सीबीएससी) याने फातिमा कॉन्व्हेन्ट स्कूल उच्च प्राथमिक स्तरातून विज्ञान प्रतिकृती (मोबाईल इनव्हर्टर) मांडले होते. याला द्वितीय क्रमांक मिळून जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे तर इम्तियाज शेख ए. डी. नाईक हायस्कूलचे (कलाध्यापक) यांनी माध्यमिक गटातून साऊंड वेव्हज एन्ड साऊंड पॉल्युशन) हे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनामध्ये मांडले होते. या शैक्षणिक साधनाचीदेखील द्वितीय क्रमांकाने सन्मानित करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. एकाच मंचावर पिता-पुत्राने द्वितीय क्रमांक पटकावून सन्मान स्वीकारून जिल्हास्तरासाठी निवड होण्याचा बहुमान क्वचित येतो. विज्ञानप्रेमी शिक्षक, मित्रपरिवार यांनी शेख पिता-पुत्राच्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मुनीर शेख, मुख्याध्यापक समीर गडबडे तसेच प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-----

rat१८p६.jpg ः
७६४१६
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने पावस येथील महिला वृद्धाश्रमाला भेट देऊन किराणा धान्य वाटप केले.

महिला वृद्धाश्रमाला़ धान्य भेट

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे नातुंडे येथील संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने पावस येथील महिला वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट देऊन सामाजिक उपक्रम म्हणून किराणा धान्य वाटप केले. मावळंगे गावातील संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने गावामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. त्या माध्यमातून समाजाला चांगली दिशा देण्याच्या उद्दिष्टाने काम केले जाते. या माध्यमातून तरुण पिढीला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम अग्रक्रमाने उपलब्ध करून दिले आहे. दरवर्षी गेली सलग नऊ वर्ष रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यावर्षी २६ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले आहे. गावांमध्ये अशी विविध कार्यक्रम करून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम केले जाते. त्यातील एक भाग म्हणून प्रथमच पावस येथील आनंदी अनुसूया महिला वृद्धाश्रमाला प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप साटले यांच्याकडून रोख रुपये ५ हजार देणगी देण्यात आली.
--------
बुटाला हायस्कूलमध्ये मळेकरांचे व्याख्यान

गावतळे ः दापोली तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल येथे श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंती सप्ताहानिमित्ताने १६ जानेवारीला प्रगत शेती कशी करावी याबाबत विद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रगतशील शेतकरी आशिष मळेकर यांचं व्याख्यान झाले. मळेकर यांनी कोकणात स्वयंपूर्ण शेती कशी होऊ शकते याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. हळद लागवड कशी करावी व त्यातून मिळणारे फायदे याचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य नलावडे, ज्येष्ठ शिक्षक कुचनुरे, कालेकर उपस्थित होते.
-------

rat१८p१०.jpg ः
७६४०१
वेळंब ः बंधारा बांधकामामध्ये श्रमदान करणारे वेळंबचे ग्रामस्थ.

वेळंब येथे पाण्यासाठी श्रमदान

गुहागर ः नळपाणी योजनेच्या विहिरीसाठी तसेच शेती बागायतीसाठी पाण्याचा वापर होण्याच्यादृष्टीने ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असे उद्गार ग्रामपंचायत वेळंबच्या सरपंच समिक्षा बारगोडे यांनी काढले.
पंचायत समिती गुहागरच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम २०२२-२३ अंतर्गत ग्रामपंचायत वेळंब येथील कातळवाडी पऱ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. या वेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. या बंधाऱ्याचा उपयोग कातळवाडीतील नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी तसेच वाडीतील नारळ सुपारीच्या बागायतीसाठी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी सरपंच समिक्षा बारगोडे, श्रीकांत मोरे, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, कृषी सहाय्यक गवारी, प्रमोद राणे, सुरेश जाधव, परशुराम घाडे, वैष्णवी घाडे, प्रगती माळी, पोलिस पाटील स्वप्नील बारगोडे, महिला मंडळ व ग्रामस्थांनी उपस्थित राहून श्रमदान केले.