कुडाळमध्ये ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल मॅरेथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल मॅरेथॉन
कुडाळमध्ये ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल मॅरेथॉन

कुडाळमध्ये ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल मॅरेथॉन

sakal_logo
By

76462
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना गजानन कांदळगावकर व पदाधिकारी. (छायाचित्र ः अजय सावंत)


कुडाळमध्ये ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल मॅरेथॉन

१२ फेब्रुवारीला आयोजन; सायकलिस्ट्स असोसिएशन, कुडाळ क्लबचा पुढाकार

कुडाळ, ता. १९ ः सायकलिस्ट्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग (सीएएस) आणि कुडाळ सायकल क्लब आयोजित इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२३ या सायकल मॅरेथॉनचे आयोजन १२ फेब्रुवारीला बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कुडाळ एमआयडीसी येथे करण्यात आले आहे. सायकल मॅरेथॉन २५, ५०, १०० किलोमीटर गटात होणार असून सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटक, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, मुंबई येथील सायकलपटू सहभागी होणार आहेत, अशी माहिती कुडाळ सायकल क्लबचे अध्यक्ष रुपेश तेली, सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पाईस कोकण येथे झालेल्या पत्रकार परिषदेला इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे, सायकलिंग असोसिएशनचे सिंधुदुर्ग सचिव अमोल शिंदे, राजन बोभाटे, सचिन मदने, डॉ. सिध्दार्थ परब, प्रमोद भोगटे, प्रथमेश सावंत, राजन बोभाटे, अमोल शिंदे, अजिंक्य जामसंडेकर, जयदीप पडवळ आदी उपस्थित होते.
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्वांना बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच सर्व स्पर्धकांना टीशर्ट दिली जातील. स्पर्धेत २५ किलोमीटर गटात कुडाळ, वेंगुर्ले, मठ, पोलिस लाठी, कुडाळ ५० किलोमीटर गटात कुडाळ, मठ, वेंगुर्ले बंदर, कुडाळ, १०० किलोमीटर गटात कुडाळ, वेंगुर्ले बंदर, केळूस, म्हापण, चिपी, कुंभारमठ, मालवण, चौके नेरुरपार, कुडाळ एमआयडीसी असा मार्ग असेल. २५ किलोमीटरसाठी २ तास, ५० किलोमीटरसाठी ४ तास व १०० किलोमीटरसाठी ७.३० तास अशी वेळ निश्चित केली आहे. स्पर्धेच्या मार्गावर क्लबतर्फे हायड्रेशन पॉईंट्स, सपोर्ट व्हेईकल, अॅम्ब्युलन्स सोबत तज्ज्ञ सायकलस्वार अशी सुरक्षेच्या दृष्टीने तयारी ठेवली आहे. ही स्पर्धा म्हणजे स्वच्छ पर्यावरणाचा व उत्तम आरोग्याचा संदेश देणारी रॅली ठरेल. स्पर्धेत क्रमांकांना फारसे महत्त्व नसून स्पर्धा पूर्ण करण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे. या भव्य सायकलिंग मॅरेथॉनमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन तेली, कांदळगावकर यांनी केले.