
शिडवणे नं. १ शाळेत विकास आराखडा सभा
76657
शिडवणे ः शाळा विकास आराखडा सभेला उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती सदस्य.
शिडवणे नं. १ शाळेत
विकास आराखडा सभा
तळेरे : शिडवणे नं.१ शाळेची मासिक विकाक आराखडा सभा नुकतीच झाली. या सभेमध्ये विविध शैक्षणिक विषयांवर विचार विनिमय करून आपत्कालीन समिती गठीत करण्यात आली. यामध्ये समिता सुतार, सचिन सुतार, सचिन टक्के, समीर कुडतरकर, मनाली धुमाळ, पाटणकर, डॉ. संजय कोकाटे, प्रेरणा कासार्डेकर, जयवंत टक्के, महेंद्र गिरकर, अमोल भोवड, अमोल येतकर, प्रवीण शेट्ये आणि नीलेश टक्के यांची निवड करण्यात आली. प्रजासत्ताक दिनासह सांस्कृतिक कार्यक्रमांवर चर्चा करून नियोजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रवीण कुबल यांनी, मुख्याध्यापक सुनील तांबे यांनी आभार मानले. सभेला समिता सुतार, मनोहर कोकाटे, अनिल पांचाळ, समीर कुडतरकर, सचिन टक्के, प्रेरणा कासार्डेकर, सुप्रिया पाष्टे, लवेश कासार्डेकर, सेजल भोवड आदी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.