जिल्ह्यात आज शिष्यवृत्ती सराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात आज
शिष्यवृत्ती सराव
जिल्ह्यात आज शिष्यवृत्ती सराव

जिल्ह्यात आज शिष्यवृत्ती सराव

sakal_logo
By

शिष्यवृत्ती सराव
परीक्षा आज
ओरोस ः अखिल संघ दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग २०२३ ही अखिल महाराष्ट्र शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग आयोजित जिल्हा परिषद शाळेलीत पाचवीसाठीची शिष्यवृत्ती मोफत सराव परीक्षा उद्या (ता. २०) सकाळी १० ते ४ या वेळेत संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळेत घेतली जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातील केंद्रशाळा किंवा केंद्रातील सोयीची शाळा या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल त्याच दिवशी रात्री तालुका निहाय जाहीर करण्यात येणार आहे. तालुका व जिल्हा स्तरावर टॉपटेन यादी तयार करून सुमारे १०० विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालकांचा सत्कार केला जाणार आहे.
---
सारस्वत समाज
अध्यक्षपदी नाईक
वेंगुर्ले ः सारस्वत ब्राम्हण समाज सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी दिगंबर नाईक, खजिनदारपदी सुधीर झांटये, सचिवपदी अमृता पाडगावकर, तर उपसचिवपदी अवधूत नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील स्वामिनी मंगल कार्यालयात याबाबतची बैठक झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय पुनाळेकर, राखी दाभोलकर, डॉ. प्रसाद साळगावकर, सुषमा प्रभुखानोलकर, सीमा नाईक, स्मिता नाबर, अॅड. प्रथमेश नाईक, अमोल आरोसकर, सचिन वालावलकर, तृप्ती आरोसकर, स्वाती पोतदार, अजय खानोलकर यांची निवड केली.
--
निवृत्त पोलिसांची
ओरोस येथे बैठक
कुडाळ ः निवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेची बैठक निवृत्त पोलिस पालव यांच्या कुंदे फाटा कसाल येथील श्री साई माऊली बेन्क्वेट हॉलमध्ये २३ ला सकाळी साडेदहाला आयोजित केली आहे. निवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पोलिस निवृत्त अधिकारी व कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन राणे यांनी केले आहे. यावेळी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात येणार आहे. कोणाच्या काही अडचणी असतील त्या लिखित स्वरुपात आणाव्यात. ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला असेल, त्यांच्या वारसांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राणे यांनी केले आहे.
...............
सोन्सुरे परिसरात
बिबट्याची दहशत
वेंगुर्ले ः सोन्सुरे (ता.वेंगुर्ले) येथे भरवस्तीत बिबट्याचा वावर सुरू असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी वन विभागाला माहिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आरवलीचे सरपंच तातोबा कुडव यांनी केली आहे. या बिब़ट्याला कुत्रे पळविण्याची चटक लागली असून याचा विचार करता गावातील गुरेढोरे तसेच शेळ्यांना धोका निर्माण झाला आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.