
मोटारसायकलस्वार दंड
rat१८२४.txt
बातमी क्र..२४
अपघातास कारणीभूत ठेरलेल्याला साडेतीन हजारांचा दंड
रत्नागिरी ः शहरातील शिवाजीनगर येथे मद्य सेवन करून दुचाकी निष्काळजीपणे चालवून दोन मोटारीमध्ये अपघातास कारणीभूत ठरलेल्याला न्यायालयाने साडे तीन हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दीपक आनंद जाधव (वय ४४, रा. मांडवी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना २९ डिसेंबर २०२२ सकाळी शिवाजी नगर रस्त्यावर घडली होती. आरोपी हे मद्य सेवन करून दुचाकी घेऊन साळवीस्टॉप ते माळनाका असे जात होते. शिवाजीनगर बसस्टॉप येथे आले असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून पुढे जाणाऱ्या मोटारीला पाठीमागून ठोकर दिली. त्यामुळे ती मोटार रस्त्याच्या पलिकडे थांबलेल्या दुसऱ्या मोटारीवर आदळून अपघात झाला. दोघे मोटारचालक किरण शांताराम शिंदे व निखिल सुनील सावंत यांना दुखापत झाली तर तीनही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी किरण शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कोकरे यांनी केला. तपासात पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. काल (ता.१८) या खटल्याचा निकाल न्यायालय वर्ग-६ न्यायदंडाधिकारी यादव यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. या कामी पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेडकॉन्स्टेबल दुर्वास सावंत व साळवी आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल लिंगायत यांनी काम पाहिले.
---
ग्राहक पंचायतीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक
रत्नागिरी ः अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात झाली. उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय व्यवस्थाप्रमुख मंगेश भेंडे, राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा, राष्ट्रीय संगठन मंत्री दिनकर सबनीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. अ. भा. ग्राहक पंचायतीच्या भारतभरातील विविध ३६ प्रांतातून ३५ कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी अ. भा. ग्राहक पंचायत, कोकण प्रांताच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या मध्ये अध्यक्ष चंद्रकांत झगडे, सचिव मानसिंग यादव, सहसचिव सुभाष गोवेकर, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, संतोष ओक, आनंद ओक, प्रणिता धामणस्कर यांचा समावेश होता.
----