स्वच्छतेची सुरुवात घरापासून करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतेची सुरुवात घरापासून करा
स्वच्छतेची सुरुवात घरापासून करा

स्वच्छतेची सुरुवात घरापासून करा

sakal_logo
By

76704
सावंतवाडी ः समाज मंदिर परिसर स्वच्छता अभियानात सहभागी पदाधिकारी व नागरिक.

स्वच्छतेची सुरुवात घरापासून करा

गोविंद वाडकर ः सावंतवाडीत समाज मंदिर परिसराची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः आपले घर व घराचा परिसर प्रत्येकाने स्वच्छ ठेवल्यास स्वच्छता अभियान घेण्याची गरज पडणार नाही, असे उद्गार माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी रविवारी काढले. सावंतवाडी पालिका व भीमगर्जना बौद्ध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने य़ेथील समाज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वाडकर व पालिकेच्या आरोग्य निरीक्षक रसिका नाडकर्णी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदम यांनी सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. वाडकर यांनी यापुर्वी प्रभागात केलेल्या कामांची माहिती, परिस्थिती सांगितली. पालिकेच्या माध्यमातून सुधारणा केल्याचे सांगून मंडळाने संयुक्तरित्या राबविलेल्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. दरम्यान, यावेळी मंडळातील सभासद व कर्मचाऱ्यांनी समाज मंदिर परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व इतर परिसर स्वच्छ केला. प्रस्तावना मंडळाचे अध्यक्ष कदम व आभार प्रदर्शन सुरेश कांबळे यांनी केले.
या संयुक्त स्वच्छता अभियानामध्ये पालिकेच्या आरोग्य निरीक्षक रसिका नाडकर्णी, पांडुरंग नाटेकर, दीपक म्हापसेकर, गोविंद वाडकर, मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदम, सचिव प्रवीण कांबळे, खजिनदार प्रशांत पाटणकर, कार्याध्यक्ष सुरेश कांबळे, सदस्य दयाळ जाधव, वासुदेव कदम, सुरेश खोब्रागडे, किशोर जाधव, धोंडी अणावकर, नारायण जाधव, मयूर कांबळे, लक्ष्मी जाधव, मानसी कदम, ज्योती जाधव, संगीता मरुडेकर, निवेद कांबळे, दशरथ वाडकर, संतोष वाडकर व प्रभागातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.
--
प्रभागनिहाय स्वच्छता अभियान स्पर्धा
आरोग्य निरीक्षक नाडकर्णी यांनी पालिका प्रभागनिहाय स्वच्छता अभियान स्पर्धा घेणार आहे. त्यावेळी या प्रभागानेही सहभाग घ्यावा. स्पर्धेमध्ये प्रभाग स्वच्छतेचा प्रथम क्रमांक आला पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून स्वच्छता अभियान हाती घ्यावे, असे आवाहन केले. आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी येथील समाज मंदिर, मंदिराचा परिसर इतर समाज मंदिरांपेक्षा स्वच्छ व आदर्शवत असल्याचे सांगून मंडळाने स्वच्छता अभियान घेतल्याबद्दल आभार मानले.