
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात
rat१९२३.txt
( टुडे पान २ साठी)
- rat१९p३१.jpg ः
७६७२०
राजापूर ः कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत.
खंडपीठ कृती समितीबरोबर लवकरच बैठक
मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन ; माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा ः
राजापूर, ता. १९ ः मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्कीट बेंच स्थापन व्हावे यासाठी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सर्किट बेंच संबधी चर्चा केली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन सकारात्मक असून कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचीबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे सर्किट बेंचबाबत सहा जिल्ह्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या ६ जिल्ह्यांकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करावे, अशी गेल्या ३५ वर्षापासून मागणी आहे. त्याबाबत यापूर्वी सर्वपक्षीय बैठक झाली. तत्पूर्वी धरणे, न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणे, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे अशी आंदोलनेही करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीना पत्र पाठवून कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याची विनंती करण्यात आली होती. राज्याच्या कॅबिनेटमध्ये ठरावही झाला. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही वा निर्णय झालेला नाही. या विषयाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने माजी राज्यमंत्री खोत यांची भेट घेऊन सर्किट बेंचच्या स्थापनेचा प्रश्न शासनाकडे मांडून त्यांचे लक्ष वेधण्याची विनंती केली होती. माजी राज्यमंत्री खोत यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन कोल्हापूर येथे ६ जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे सूचित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन सकारात्मक असून मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले.