वर्षात 150 रुपयाने वाढला घरगुती गॅस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षात 150 रुपयाने वाढला घरगुती गॅस
वर्षात 150 रुपयाने वाढला घरगुती गॅस

वर्षात 150 रुपयाने वाढला घरगुती गॅस

sakal_logo
By

rat१९२७.txt

(पान ३ साठी)

वर्षात दिडशे रुपयाने वाढला घरगुती गॅस

चुलीकडे जाता येईना ; व्यावसायिक सिलेंडर ६३७ रुपयाने कमी

रत्नागिरी, ता. १९ ः घरगुती सिलिंडरच्या दरामध्ये होणाऱ्या चढ-उताऱ्याने गृहिणींचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. सिलिंडर आता ११०० रुपयांच्या जवळ आला आहे. शहरी भागातील महिलांची ही परिस्थिती आहे तर ग्रामीण भागातील महिला तर अजून अडचणीत आल्या आहेत. आता सिलिंडर परवडेना आणि चुलीचा पर्याय प्रतिष्ठेला रूचेना त्यामुळे महिलांची द्विधा मनस्थिती झाली आहे. वर्षभरात घरगुती गॅसचा दर १५० रुपयाने वाढला आहे तर व्यावसायिक गॅसची किंमत वर्षभरात ६३७ रुपयाने कमी झाली आहे.

जिल्ह्यात सुमारे ५ लाखादरम्यान कार्डधारक आहेत. त्यापैकी सिलिंडर असलेल्यांची संख्यादेखील ३ लाखाच्या वर आहे. त्यापैकी अनेक महिलांना उज्ज्वला गॅस योजनेचाही लाभ घेतला आहे; परंतु एकदाच त्यांना सिलिंडरला अनुदान मिळणार आहे. योजनेला आता अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यात गेल्या दीड वर्षामध्ये सिलिंडरच्या सततच्या वाढत्या दराने गृहिणींसह नोकरदार वर्ग मेटाकुटीला आला. दर चार-आठ दिवसांनी गॅसच्या दरात काही पैसे आणि रुपयात वाढ होत होती. जानेवारी २०२२ मध्ये ९१५ रुपये असलेला सिलिंडर डिसेंबर २०२२ पर्यंत १०६७ रुपयापर्यंत गेला. म्हणजे वर्षभरात १५० रुपयाने सिलिंडर वाढला. व्यावसायिक सिलिंडरामध्येही मोठी वाढ झाली. मे २०२२ मध्ये सर्वाधिक २३८९ रुपये झाला होता; पण ते कमी होऊन २ हजार ६७, २ हजार ५२, १ हजार ७२६ रुपयावर वर आले आहेत. व्यावसायिक सिलिंडर वर्षात ६३७ रुपयांने कमी झाला आहे. ग्रामीण भागातही गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आता सिलिंडरची वाढती किंमत परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला मोठ्या संकटात सापडल्या आहेत.

घरगुती सिलिंडरच्या किमंतीचे स्वरूप
महिना*घरगुती*व्यावसायिक
१ जानेवारी*९१५*२०३२
१ फेब्रुवारी*९१५*१९४०
१ मार्च*९१५*२०३३
१ एप्रिल*९६५*२२९५
१ मे*९६५*२३८९
१ जून*१०१७*२२६२
१ जुलै*१०६७*२०५२
१ ऑगस्ट*१०६७*०२७
१ सप्टेंबर*१०६७*१९३५
१ ऑक्टोबर*१०६७*१८९२
१ नोव्हेंबर*१०६७*१७२६
१ डिसेंबर*१०६७*१७५२