वाशिष्ठी डेअरीमुळे कोकणी शेतकरी होईल सक्षम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशिष्ठी डेअरीमुळे कोकणी शेतकरी होईल सक्षम
वाशिष्ठी डेअरीमुळे कोकणी शेतकरी होईल सक्षम

वाशिष्ठी डेअरीमुळे कोकणी शेतकरी होईल सक्षम

sakal_logo
By

rat१९३६.txt

( पान ५)

फोटो - RATCHL१९२.JPG ः

चिपळूण ः केंद्राचे उद्घाटन करताना चेअरमन सुभाषराव चव्हाण.

वाशिष्ठी डेअरीने शेतकरी होणार सक्षम

सुभाष चव्हाण ; खेरशेत येथे दूध संकलन केंद्राचे उद्घाटन

चिपळूण, ता. १९ ः वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या दुग्धप्रकल्पामुळे कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वास चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी व्यक्त केला. वाशिष्ठी पंचक्रोशी सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या खेरशेत येथील दूध संकलन केंद्राचे गुरुवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

या वेळी चव्हाण म्हणाले, जिल्हा सहकारी बँक, चिपळूण नागरी पतसंस्था आणि वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे प्रयत्न भविष्यात केले जातील. दुग्धप्रकल्प चालवताना विश्वासार्हता महत्वाची असते. ती जपण्यासाठी तशी कार्यपद्धती वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून अवलंबली जाईल. संचालक प्रशांत यादव यांनी प्रास्ताविकात दुग्धप्रकल्प उभारण्याची संकल्पना स्पष्ट केली. शेतकऱ्यांना वाशिष्ठीच्या माध्यमातून योग्य हमीभाव दिला जाईल, असा विश्वास दिला. कोकणातील शेतकरी टिकला पाहिजे, उभा राहिला पाहिजे, या उद्देशानेच हा प्रकल्प उभारण्यात आल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी गाई-म्हशी खरेदीसाठी शेतकऱ्यांना ९ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही यादव यांनी दिली. वाशिष्ठी डेअरीच्या दूध संकलनाला चिपळूण तालुक्यासह नजीकच्या तालुक्यांमधून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी वाशिष्ठी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून मालघर, वेरळ, दस्तुरी-चिंचघरी, आंबडस, पिंपळीखुर्द येथे वाशिष्ठी डेअरीच्या परिसरात, कापसाळ येथे दूध संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खेरशेत येथे दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल.