Sun, Jan 29, 2023

तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
Published on : 19 January 2023, 3:14 am
rat१९४७.txt
( पान ३ )
रत्नागिरीतील तरूणाची आत्महत्या
रत्नागिरी, ता.१९ ः शहराजवळील नाचणे गोडाऊन स्टॉप येथे तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सम्यक अंनत जाधव(वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सम्यक हा गुरुवारी दुपारपासून घरी होता. त्याची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. सायंकाळी त्याची आई घरी आली असता तिला सम्यक हार्दिक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. समोरील चित्र पाहून त्याच्या आईने आक्रोश केला. त्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावत आले. या प्रकाराची माहिती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सम्यक याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. या घटनेची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली.