सागर महोत्सवाचा दुसरा टप्पा उद्यापासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागर महोत्सवाचा दुसरा टप्पा उद्यापासून
सागर महोत्सवाचा दुसरा टप्पा उद्यापासून

सागर महोत्सवाचा दुसरा टप्पा उद्यापासून

sakal_logo
By

rat२०p१६.jpg-
७६९३७
रत्नागिरी : सागर महोत्सवाअंतर्गत भाट्ये येथे वाळूशिल्प प्रदर्शनाची तयारी सुरू आहे.
----------
सागर महोत्सवात आजपासून वाळूशिल्पे
आसमंत फाउंडेशनची माहिती; किनारा, खारफुटी जंगल सफरीचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : पहिल्या सागर महोत्सवाचा दुसरा टप्पा उद्यापासून (ता. २१) सुरू होत आहे. यामध्ये वाळूशिल्प प्रदर्शन, खडकाळ समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची अभ्यासपूर्ण सफर असे विविध कार्यक्रम होणार आहेत. वाळूशिल्प व भेट कार्यक्रमासाठी पूर्ण तयारी झाली आहे. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशनचे प्रमुख संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी मेहनत घेतली आहे.
रत्नागिरीत प्रथमच आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजीकल सोसायटी, विवांत अनटेम्ड अर्थ फौंडेशन आणि कोस्टल कॉन्झर्वेशन ग्रुप या सहयोगी संस्थांनी सागर महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात व्याख्याने आणि माहितीपट गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये दाखवण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष किनारा आणि खारफुटी जंगल भेट आयोजित केली आहे. भाट्ये येथे वाळूशिल्प प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. यामध्ये सागर व पर्यावरण संवर्धनविषयक अनेक वाळूशिल्प पाहता येणार आहेत.
२१ जानेवारीला सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत भाट्ये किनाऱ्याची पायी सैर घडवण्यात येणार आहे. या वेळी प्रदीप पाताडे, अमृता भावे मार्गदर्शन करतील. ७ ते ९.३० या वेळेत कर्ला येथील कांदळवन सफर हेमंत कारखानीस, संतोष तोसकर व संजीव लिमये घडवतील. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्याची सफर प्रदीप पाताडे व अमृता भावे घडवतील. वाळूशिल्प भाट्ये किनाऱ्यावर पाहता येतील. सागर महोत्सवानिमित्त दि २१ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस मत्स्यालय, मत्स्य संग्रहालय आणि मत्स्य शेती फार्म पाहण्यासाठी सगळ्यांकरिता विनामूल्य खुले ठेवण्यात येणार आहे. याचा विद्यार्थी वर्गाने लाभ घ्यावा. यासंबंधी अधिक माहितीसाठी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.