
खासदार संजय राऊतांचा वेंगुर्लेत भाजपतर्फे निषेध
76996
वेंगुर्ले ः येथील पोलिस स्थानकात निवेदन देताना भाजप पदाधिकारी.
खासदार संजय राऊतांचा
वेंगुर्लेत भाजपतर्फे निषेध
वेंगुर्ले, ता. २० ः केंद्रीय मंत्री व भाजपचे राष्ट्रीय नेते नारायण राणे यांच्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केल्याबद्दल त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, या घटनेचा वेंगुर्ले भाजपतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राऊत यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा, कायदेशीर कारवाई करावी, असे न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालिका अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, सोमनाथ टोमके, तालिका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेविका श्रेया मयेकर, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे, नगरसेवक धर्मराज कांबळी, नगरसेविका श्रेया मयेकर, साईप्रसाद नाईक, जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर, गणेश गावडे, शामसुंदर मुननकर, माजी सरपंच मनोज उगवेकर, युवा मोर्चाचे तुषार साळगावकर, भूषण सारंग, प्रीतम सावंत, किसान मोर्चाचे बाळु प्रभू, बुथ अध्यक्ष रविंद्र शिरसाट, पुंडलिक हळदणकर, विजय नाईक, महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, रफिक शेख उपस्थित होते.