
बावशी-गावठण येथे विविध धार्मिक कार्यक्रम
77005
बावशी ः येथील गणेश मूर्ती.
बावशी-गावठण येथे
विविध धार्मिक कार्यक्रम
नांदगाव, ता. २० ः श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर (बावशी गावठण) यांच्यातर्फे प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, लोकार्पण व दर्शन सोहळा रविवारपासून (ता.२२) ते गुरुवारपर्यंत (ता.२६) आयोजित केला आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २२ ला सकाळी दहाला तोंडवली दत्त मंदिर ते बावशी गणेश मूर्ती आणि कलश मिरवणूक, सायंकाळी सातला सांस्कृतिक कार्यक्रम, २३ ला सकाळी आठला धार्मिक विधी, महाप्रसाद, दुपारी तीनला हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी सातला सांस्कृतिक कार्यक्रम, मंदिर प्रदक्षिणा, रात्री नऊला भजन, २४ ला सकाळी आठला होमहवन, दुपारी एक ते तीन दरम्यान महाप्रसाद, सायंकाळी सहाला आरती आणि मंदिर प्रदक्षिणा, रात्री नऊला बुवा विनोद चव्हाण विरुद्ध बुवा गुंडू सावंत विरूद्ध बुवा संदीप लोके यांचा तिरंगी भजनांचा जंगी सामना होईल. २५ ला सकाळी आठला होमहवन, मूर्ती स्थापना दुपारी एक ते तीन महाप्रसाद, सायंकाळी साडेसहाला आरती आणि मंदिर प्रदक्षिणा, रात्री दहाला महान पौराणिक दशावतार नाटक, २६ ला कार्यक्रमाची सांगता आणि ब्राह्मण भोजन. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पावणा देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, बावशी गावठाण यांनी केले आहे.