स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

sakal_logo
By

बातमी क्र..४० (पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat२०p३४.jpg ः
७७०३१
चिपळूण ः स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे.
--
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध स्पर्धा

चिपळूण नगरपालिका ; विजेत्यांचा सन्मान

चिपळूण, ता. २० ः स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालेल्या चिपळूण नगर पालिकेने यावर्षी राज्यात प्रथम येण्यासाठी कंबर कसली आहे. या अभियानात लोकसहभाग वाढावा, नागरिक, व्यावसायिक, विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांना शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरपालिकेच्या सभागृहात या स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातर्फे सप्टेंबर महिन्यापासून या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे मूल्यमापन व मूल्यांकन शासनाने नियुक्त केलेल्या दिव्यस्वप्न फाउंडेशनच्या टीमने केले. यामध्ये स्वच्छ आस्थापना स्पर्धेतील स्वच्छ हॉटेल स्पर्धेत आदर्श उपहारगृह प्रथम, ओवॅसिस हॉटेल द्वितीय, शिवसागर ॲनेक्स हॉटेल तृतीय. स्वच्छ हॉस्पिटल स्पर्धेत अनुक्रमे क्र. जोशी बालनेत्र रुग्णालय, पाटणकर नर्सिंग होम, खेडकर हॉस्पिटल. स्वच्छ शाळा/हायस्कूल/महाविद्यालय स्पर्धेत अनुक्रमे क्र. युनायटेड इंग्लिश स्कूल, परांजपे मोतीवाले हायस्कूल, डीबीजे महाविद्यालय. स्वच्छ शासकीय कार्यालय स्पर्धेत अनुक्रमे क्र. दिवाणी सत्र न्यायालय, चिपळूण पोलिस ठाणे, बांधकाम भवन. स्वच्छ रहिवासी संकूल स्पर्धेत अनुक्रमे क्र. ग्रीन कर्व्ह अपार्टमेंट (परांजपे स्कीम), स्वरविहार गृहसंकूल, कृष्णेश्‍वर नगर हे विजयी झाले.

स्वच्छ बाजार समितीमध्ये अनुक्रमे क्र. धवलमार्ट, जिव्हाळा मार्ट, चिपळूण बाजार. स्वच्छता स्पर्धांतर्गत निबंध स्पर्धेत श्‍वेता चव्हाण प्रथम, साहिल भुवड द्वितीय, रामेश्‍वरी नलावडे तृतीय, चित्रकला स्पर्धेत श्‍लोक पवार प्रथम, किमया विचारे द्वितीय, अर्चना बोडेकर तृतीय. लघुचित्रपट स्पर्धेत स्वामिनी घस्ते प्रथम, गणेश घस्ते द्वितीय, जिंगल स्पर्धेत गणेश घस्ते प्रथम, अभिजित पिसे द्वितीय. पथनाट्य स्पर्धेत डीबीजे महाविद्यालय प्रथम, श्री. आनंदराव पवार महाविद्यालय द्वितीय, स्वच्छतादूत म्हणून कैसर इस्माईल देसाई, स्वच्छता चॅम्पियन स्पर्धांतर्गत स्वयंसेवी/सामाजिक संस्था स्पर्धेत डॉ. श्री. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान, युवक मंडळ/महिलामंडळ स्पर्धेत सहेली ग्रुप चिपळूण, नागरिकांमध्ये विनायक पवार, महिला बचत गट स्पर्धेत सुजाता बुरटे-मोरया स्वयंसहाय्यता महिला बचतगट प्रथम तर रसिका जाधव- भिमाई महिला बचतगट पाग-द्वितीय, सीएसआरमध्ये डॉ. सत्यजित एकांडे-श्री. सद्गुरू विश्‍वनाथ महाराज रूकडीकर ट्रस्ट आदींचा मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, उपमुख्याधिकारी बाळकृष्ण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, महिला व बालकल्याण समिती प्रमुख प्रसाद साडविलकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, निसर्गप्रेमी नांदगावकर आदी उपस्थित होते.