परिवर्तनासाठी ‘सहकार समृद्धी’ रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिवर्तनासाठी ‘सहकार समृद्धी’ रिंगणात
परिवर्तनासाठी ‘सहकार समृद्धी’ रिंगणात

परिवर्तनासाठी ‘सहकार समृद्धी’ रिंगणात

sakal_logo
By

लोगो ः देवगड अर्बन बँक निवडणूक
---

परिवर्तनासाठी ‘सहकार समृद्धी’ रिंगणात

संदेश पारकर ः काँग्रेस, ठाकरे गटाची संयुक्त सभेत राष्ट्रवादीच्या युतीवर टीका

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः येथील देवगड अर्बन को-ऑप. बँकेतील अनेक वर्षांची एकाच विचाराची असलेली सत्ता उलथवून बँक प्रगतिपथावर नेण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संयुक्तपणे ‘सहकार समृद्धी पॅनेल’ निवडणूक रिंगणात उतरवले आहे. परिवर्तनासाठी मतदार आपल्यासोबत असल्याचे शिवसेना नेते संदेश पारकर यांनी येथे सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांविरूद्ध आंदोलन छेडणाऱ्या भाजपसोबत येथील राष्ट्रवादीने अभद्र युती केल्याची टीकाही श्री. पारकर यांनी यावेळी केली.
येथे काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची देवगड अर्बन बँक निवडणूकीच्या अनुषंगाने संयुक्त सभा झाली. त्यानंतर श्री. पारकर यांच्यासह अन्य माध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, सूरज घाडी, ठाकरे शिवसेना गटाचे युवक जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, सुगंधा साटम, उल्हास मणचेकर, सुरेश देवगडकर, गणेश गावकर, रवींद्र जोगल, संभाजी साटम आदी उपस्थित होते.
श्री. पारकर म्हणाले, ‘‘बँकेवर सातत्याने एकाच राजकीय विचारधारचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, मागील अनेक वर्षे सत्तेत राहूनही म्हणावी तशी बँकेला प्रगती साधता आली नाही. त्यामुळे मतदारांनाही आता राजकीय विचारधारा बदलण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रणित पॅनेलला मतदारांनी सहकार्य करावे. मतदारांनी एकदा संधी दिली तर निश्तिच बँकेचा विकास साधला जाईल. राज्यात सर्वत्र भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाविकास आघाडी करून अनेक निवडणूकीत उतरत असताना येथे मात्र राष्ट्रवादी भाजपसोबत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच भाजपच्यावतीने राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन छेडले होते; मात्र तरीही येथील राष्ट्रवादी भाजपसोबत आहे ही अभद्र युती म्हणावी लागेल. त्यामुळे मतदारांनी आता विचारधारा बदलण्याची आवश्यकता असून मतदार निश्‍चितच साथ देतील.
.............
चौकट
परिवर्तनासाठी रिंगणात
यापूर्वी बँकेच्या निवडणुकीत तडजोडीने जागा निश्‍चिती झाली होती. यावेळीही सन्मानपूर्वक तडजोड झाली असती तर आमच्या पॅनेलने विचार केला असता. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत पॅनेल परिवर्तनासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहे. बँकेला उर्जितावस्थेला नेण्यासाठी पॅनेल करण्यात आले असल्याचे इर्शाद शेख यांनी सांगितले.