कडावल येथे गुरुवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडावल येथे गुरुवारपासून
विविध धार्मिक कार्यक्रम
कडावल येथे गुरुवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम

कडावल येथे गुरुवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

77109
कडावल ः श्री देव महापुरुष मंदिर.

कडावल येथे गुरुवारपासून
विविध धार्मिक कार्यक्रम
कुडाळ, ता. २१ ः कडावल येथील श्रीदेव महापुरुष मंदिरात २६ जानेवारीपासून वर्धापनदिन व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनाम व इतर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापुरुष देवस्थान ट्रस्ट, व्यापारी संघटना व कडावल ग्रामस्थांनी केले आहे.
वर्धापन दिनानिमित्त २६ ला सकाळी आठला महाएकादशमी, दहाला धार्मिक कार्यक्रम, तीर्थप्रसाद, सायंकाळी सातला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रात्री साडेआठला वालावलकर दशावतारी मंडळाचे ‘ज्वाला जादूगार’ नाटक, २७ ला सायंकाळी सातला भव्य जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा होणार आहे. यामध्ये लहान गटासाठी (४ ते १४ वर्षे) प्रथम ३०२३ रुपये व चषक, २०२३ रुपये व चषक, तृतीय १०२३ रुपये व चषक, तर मोठ्या गटासाठी (१५ वर्षांवरील) प्रथम ५०२३ रुपये व चषक, द्वितीय ३०२३ रुपये व चषक, तृतीय २०२३ रुपये व चषक अशी पारितोषिके आहेत. नृत्य स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना महापुरुष युवा प्रतिष्ठान कडावलकडून सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. २८ ला अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त रात्री चक्री संगीत भजन जुगलबंदी प्राथमिक शिक्षक कलामंच प्रासादिक भजन मंडळ, कुडाळचे बुवा राजेश गुरव (पखवाज-दीपक मेस्त्री), भगवती प्रासादिक भजन मंडळ, बाव-कुडाळते बुवा लक्ष्मण नेवाळकर (पखवाज-विराज बावकर), सद्गुरू भजन मंडळ कुडाळचे बुवा वैभव सावंत (पखवाज-निखिल पावसकर) यांच्यात रंगणार आहे.