कणकवली परिसरामध्ये लवकरच मोबाईल टॉवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली परिसरामध्ये 
लवकरच मोबाईल टॉवर
कणकवली परिसरामध्ये लवकरच मोबाईल टॉवर

कणकवली परिसरामध्ये लवकरच मोबाईल टॉवर

sakal_logo
By

77160

कणकवली परिसरामध्ये
लवकरच मोबाईल टॉवर

सुशांत नाईक : नेटवर्कचा प्रश्न सुटणार

कणकवली, ता.२१ : शहरातील बांधकरवाडी, परबवाडी, कनकनगर, नाथ पै नगर येथील मोबाईल ग्राहकांसाठी तात्‍पुरता टॉवर उभारला जाणार आहे. खासदार विनायक राऊत यांनी त्‍यासाठी पाठपुरावा केला आहे, अशी माहिती शिवसेना युवासेना जिल्‍हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.
कणकवली-बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एटीसी कंपनीचा टॉवर बंद झाला होता. त्‍यामुळे या टॉवरवर असलेली खासगी कंपन्यांची मोबाईल सेवा ठप्प झाली होती. हा मोबाईल टॉवर बंद झाल्‍याने बांधकरवाडी, पिळणकरवाडी, कनकनगर, नाथ पै नगर,परबवाडी आदी भागातील मोबाईल ग्राहकांची गेले आठ दिवस गैरसोय झाली होती. या प्रकरणी शिवसेना युवासेना जिल्‍हा प्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले होते. खासदार श्री.राऊत यांनी बांधकरवाडी येथील टॉवर सुरू करण्याबाबत संबधित कंपनीशी चर्चा केली होती. यात रेल्‍वे स्थापनक हद्दीतील टॉवर काही दिवसांत अन्य जागेत स्थलांतर होणार आहे. तर रेल्‍वे स्थानक परिसरात तात्‍पुरता टॉवर उभारून ग्राहकांची गैरसोय दूर केली जात असल्‍याची माहिती सुशांत नाईक यांनी दिली.