चौदा वर्षानंतरही सागरी सुरक्षेला नाही अपेक्षित बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौदा वर्षानंतरही सागरी सुरक्षेला नाही अपेक्षित बळ
चौदा वर्षानंतरही सागरी सुरक्षेला नाही अपेक्षित बळ

चौदा वर्षानंतरही सागरी सुरक्षेला नाही अपेक्षित बळ

sakal_logo
By

rat२१२.txt

( पान ५ अॅंकर)

पोलिस दलासमोरील आव्हाने - भाग - ३

चौदा वर्षानंतरही सागरी सुरक्षा पुरेशा बळाविना

९ स्पीड बोटींपैकी ७ कार्यरत ; ४ बोटींचा प्रस्ताव खितपत

राजेश शेळके ःसकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्षे पूर्ण झाली तरी अजून जिल्ह्याची सागरी सुरक्षेला अजून अपेक्षित बळ मिळालेले नाही. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले परतवून लावण्यासाठी १४ वर्षांत सागरी सुरक्षेच्या मजबुतीला सुरवात झाली. आधुनिकतेचा विचार करता अजूनही बळ कमी आहे. पोलिसदलाकडील ९ स्पीडबोटींपैकी १ निकामी झाली, १ बंद पडली आहे. त्यामुळे फक्त ७ छोट्या बोटींवर जिल्ह्याच्या १६७ किमी सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेची भिस्त आहे. पोलिसदलाने मोठ्या ४ स्पीडबोटींचा दिलेला प्रस्ताव शासनदरबारी अजून खितपत आहे.

जिल्ह्यात २००६ नंतर सागरी पोलिस ठाण्यांची स्थापना करून सुरक्षा अधिक भक्कम करण्याच्यादृष्टीने शासनाने पाऊल टाकले; परंतु सागरी गस्तीसाठी हक्काच्या बोटी नव्हत्या. भाड्यानेच बोटी घेऊन गस्त घातली जात होती. त्यासाठी शासनाला लाखो रुपये खर्च करावे लागत होते; परंतु २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानतंर सागरी सुरक्षा उघडी पडली. त्यानंतर शासनाने सागरी सुरक्षेला महत्व देत काही वर्षातच पोलिसदलाला स्पीड बोटी दिल्या. तेव्हा प्रशिक्षित कर्मचारी बाहेरून घेण्यात आले. त्यांच्या मदतीने जिल्ह्यात सागरी गस्त सुरू झाली. हळुहळू त्याला मजबूत करण्यासाठी आणखी काही स्पीड बोटी शासनाने दिल्या. दलाला सागरी सुरक्षेसाठी ९ स्पीड बोटी मिळाल्या; परंतु कालांतराने त्यापैकी एक स्पीड बोट बंद पडली ती पूर्ण निकामीच झाली. आता ८ पैकी आणखी एक बोट बंद पडली आहे. त्यामुळे पोलिसदलात सध्या ७ बोटी कार्यरत आहे.
जिल्ह्याच्या १६७ किमी किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी या नौका किनाऱ्यावर गस्त घालत आहेत. रत्नागिरी, नाटे, जयगड, दाभोळ ही चार बोटींचे स्टेशन आहेत; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. परजिल्हा, राज्यातील अनेक अत्याधुनिक बोटी राज्याच्या सागरी हद्दीमध्ये घुसखोरी करून मासेमारी करत आहेत; मात्र त्यांचे इंजिन जास्त अश्वशक्तीचे आणि आधुनिक असल्याने सुरक्षा यंत्रणेच्या तावडीतून सहज निसटतात. त्यामुळे जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला आधुनिकतेने सज्ज बळ देण्याची गरज आहे. पोलिस दलाने त्यादृष्टीने ४ मोठ्या स्पीड बोटींची मागणी केली आहे; परंतु हा प्रस्ताव गेली काही वर्षे शासनदरबारी पडून आहे. या बोटी मिळाल्यास पोलिसदलाची सागरी सुरक्षा अधिक मजबूत आणि भक्कम होईल.

( समाप्त)
--
दृष्टीक्षेपात...
*१६७ किमी सागरी किनारा
*४२१ किमी खाडीकिनारा
*सागरी किनारी ११ बंदरे
९ सागरी पोलिस ठाणी
सव्वाशे लहान, मोठ्या जेट्या
--