भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत
भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत

भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत

sakal_logo
By

भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत
आमदार भास्कर जाधव ; नाणार, बारसू प्रकल्प होणारच नाहीत
चिपळूण, ता. २१ः भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत. त्यामुळे नाणार आणि बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत. भाजपचे केंद्रात सरकार आहे. त्यांना हे प्रकल्प करणे केव्हाही सहजशक्य आहे; मात्र विरोधाचे थातूरमातूर कारण देऊन भाजपचे राजकारण सुरू आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केला.
दापोली तालुका भगवा सप्ताहानिमित्त ते दापोलीत बोलत होते. ते म्हणाले, लाखो तरुणांच्या रोजगाराचा घास पळवण्याचे काम सरकारने केले. अखंड देश, महाराष्ट्र जेव्हा कोविडशी लढत होता तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त राजकारण करत होते. ते म्हणाले, लाखो कोटींचे प्रकल्प बाहेर पाठवायचे आणि ३०० कोटींचा प्रकल्प आणायचे एवढेच काम शिंदे-फडणवीस सरकारने केले. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना गुजरात सोडून इतर ठिकाणी मोठा प्रकल्प द्यायचे नाहीत, असे सांगितले. त्यांना महाराष्ट्राला प्रकल्प द्यायचे नाहीत एवढं त्यांचे हृदय मोठे नाही, असा आरोपही जाधव यांनी केला.