
तालुका भंडारी संघातर्फे आज हळदीकुंकू
पानवल शाळेचा अमृतमहोत्सव
रत्नागिरी ः तालुक्यातील पानवल-घवाळीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अमृतमहोत्सव २६ व २७ जानेवारीला साजरा करण्यात येणार असून या निमित्तने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय सभागृहाची पायाभरणी नवी ध्वजासंभाचे अनावरण, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, भविष्यकालीन व्यवसाय संधी या विषयावर व्याख्यान. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, महिला मेळावा, फनीगेम्स, विद्यार्थ्यांच्या वस्तूंची खरेदी-विक्री, ग्रामस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्र असे विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त होणारे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांसह शिक्षक, विद्यार्थी, मेहनत घेत आहे. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापिका स्मिता मुळ्ये यांनी केले आहे.
---------
तालुका भंडारी संघातर्फे आज हळदीकुंकू
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ अंतर्गत महिला मंडळाचा रविवारी (ता. २२) मांडवी बंदर रोड येथे कांचन पॅराडाईज गाळा नं. ७ येथे असणाऱ्या संघाच्या कार्यालयात हळदीकुंकू समारंभाचे सायंकाळी ४ ते ६ या वेळात आयोजन करण्यात आल्याची माहिती महिला मंडळाच्या अध्यक्षा विनया भाटकर यांनी दिली. तालुक्यातील भंडारी समाज मंडळाच्या जास्तीत महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
फळविक्रेत्याचे उपोषण २६ ला उपोषण
रत्नागिरीः आगामी होणाऱ्या मतदानामध्ये मतदान करताना मशिनचा वापर होत असतो. त्यामुळे अशिक्षित लोकांची गैरसोय होते. काहीवेळा मशिनमध्ये बिघाड होते. मतदान बरोबर होत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे चिन्हावर शिक्का मारुन मतदान करण्याची पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता व फळविक्रेते नाझीम अहमद झारी यांच्यासह ३२ नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासाठी २६ जानेवारीला झारी उपोषणाला बसणार आहेत.