सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन

sakal_logo
By

rat२१२१.txt

(पान ३ साठी)

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन दोघांवर गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील आठवडा बाजार येथील एका पडक्या गाळ्याजवळ मद्य प्राशन करण्याऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफत फणसोपकर (वय २२) व ताहीर कोतवडेकर (२२, दोघे रा. रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हा प्रकार शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी चारच्या सुमारास निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठवडा बाजार येथे पोलिस गस्त घालत होते. तेव्हा दोघे संशयित त्यांना मद्यप्राशन करताना मिळून आले. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----
बेशुद्धावस्थेथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः रेल्वेस्टेशन रत्नागिरी येथे बेशुद्धावस्थेत सापडलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १८) सकाळी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिस सागर पाटील यांना रेल्वेस्टेशनवर एक प्रौढ बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र गुरुवारी (ता. १९) रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
--

फोटो ओळी
-rat२१p२.jpg ः
७७१००
वासंती कदम
------------
कान्हे येथील वृद्धा बेपत्ता

चिपळूण ः तालुक्यातील कान्हे-कदमवाडी येथील वासंती विठ्ठल कदम (वय ७०) या मंगळवारी (ता.१७) पहाटे पाच वाजता घरी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या. नातेवाईकांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला असता त्या सापडलेल्या नाहीत. त्या अद्याप घरी परत न आल्याने नातेवाईकांनी अलोरे शिरगांव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद केली आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास संबधितांनी अलोरे-शिरगाव पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
--------
चिपळुणातील मेडिकल दुकानात चोरीचा प्रयत्न

चिपळूण ः शहरातील स्वामी कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावरील सपना एंटरप्रायझेस व मेडिकलच्या होलसेल दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याची प्रकार सोमवारी (ता. १६) रात्री घडला. यातील एकास नागरिकांनी पकडले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य एकजण पसार झाला आहे. या प्रकरणी दोघांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सज्जाक कादरी, परशुराम पवार असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
-------
चिपळुणात वृद्धाची आत्महत्या

चिपळूण ः तालुक्यातील बामणोली किजबिलेवाडी येथील वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. रामचंद्र बाईत (वय ७५) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. त्याने घरातील पडवीत नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सायंकाळी उघडकीस येताच तत्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिपळूण पोलिस अधिक तपास करत आहेत.