
ः ''व्हेल''ची उलटी विक्रीप्रकरणी तिघे न्यायालयीन कोठडीत
rat२१३०.txt
(पान ३ साठी)
''व्हेल''ची उलटी ; तिघांना न्यायालयीन कोठडी
खेड, ता. २१ ः भरणे येथील साई रिसॉर्टजवळ व्हेल माशाची उलटी विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या तिघांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बाळू दगडू पवार (४२, रा. धामणे-महाड), संदीप काशिनाथ चव्हाण (४७, रा. बारसगाव-महाड), संतोष सीताराम गायकवाड (५७, रा. लोहारमाळ- पोलादपूर) अशी त्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेजण महाड येथून दोन दुचाकीवरून व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी भरणे येथील एका रिसॉर्टजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात तिघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून १ किलो ८४ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. २ दुचाकी व मोबाईलही हस्तगत करण्यात आला होता. असे पोलिसांनी सांगितले.
---