
पावसमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
rat21p10.jpg
77098
पावसः बँक ऑफ इंडिया पावस शाखेतर्फे आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे.
---------------
पावसमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
पावस, ता. २१ः बँक ऑफ महाराष्ट्र, महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान ग्रामीण विकास केंद्र व कृषी विभागातर्फे
पावस गावातील व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी आयोजित एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा झाली. नारळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ संतोष वानखेडे आंबा पिकावरील कीड रोग नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व, लागवड तंत्रज्ञान, कार्यक्रमाचे वार्षिक स्वरूप याबाबत मार्गदर्शन केले. कृषि विकास अधिकारी अजय शेंडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, स्मार्ट योजना याबाबत मार्गदर्शन केले. बॅंक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य प्रबंधक नेताजी जुवेकर यांनी बॅंकेच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना सांगितल्या.