कोलझर हायस्कूलचे स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोलझर हायस्कूलचे स्नेहसंमेलन
कोलझर हायस्कूलचे स्नेहसंमेलन

कोलझर हायस्कूलचे स्नेहसंमेलन

sakal_logo
By

77225
कोलझर ः प्रशालेत विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर.

कोलझर हायस्कूलचे स्नेहसंमेलन
बांदा ः क्षितिजापलीकडे जाण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना शाळेतून शिकविले जाते. शिक्षणाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्त्व आहे, असे प्रतिपादन कोलझर देवस्थान समिती अध्यक्ष शामराव देसाई यांनी कोलझर येथे केले. कोलझर येथील समाजसेवा हायस्कूलचा शालेय क्रीडा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून देसाई बोलत होते. व्यासपीठावर समन्वय समिती सदस्य सुभाष बोंद्रे, मनोजकुमार देसाई, अमर सावंत, मानसी देसाई, पी. बी. राणे, मुख्याध्यापक एस. डी. राठोड उपस्थित होते. यावेळी वैयक्तिक मैदानी स्पर्धा व सांघिक स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना प्रशालेकडून प्रमाणपत्रे देण्यात आली. मनोजकुमार देसाई यांनी वडील (कै.) साजुराम देसाई यांच्या स्मरणार्थ पदके पुरस्कृत केली होती. यावेळी व्हिक्टोरी स्टँड उभारण्यात आल्याने स्पर्धकांना उच्च दर्जाच्या पारितोषिक वितरणाचा आनंद मिळाला. सुभाष बोंद्रे व मुख्याध्यापक एस. डी. राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक सुनील परब यांनी केले. सहाय्यक शिक्षक सागर पांगुळ यांनी सूत्रसंचालन केले. सागर डेगवेकर यांनी आभार मानले.