माणगावात अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगावात अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
माणगावात अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

माणगावात अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

77304
माणगाव ः अभिनय स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसमवेत पालक, शिक्षक व संस्था पदाधिकारी.

माणगावात अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
माणगाव, ता. २२ ः येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयात १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाचनालयात अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण आठ शाळांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. दत्ता शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण २८ मुलांनी विविध व्यक्तिरेखा सादर केल्या. यात छत्रपती शिवाजी महाराज, सावित्री बाई फुले, जिजाऊ अशा व्यक्तिरेखा सादर करत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असाः तिसरी ते चौथी गट-प्रथमेश मेस्त्री, हर्षिता राणे, श्रीपाद गायचोर, उत्तेजनार्थ राधा पाडगावकर. पाचवी ते सातवी-संस्कृती लाड, अनुष्का काणेकर, दिव्या मेस्त्री, उत्तेजनार्थ वेदांती लाड. आठवी ते दहावी-संपदा नाईक, सिद्धी जामदार, नंदिनी म्हाडगुत, उत्तेजनार्थ करिना मुंज यांनी यश संपादन केले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. दत्ता शिरसाट व विजय पालकर यांनी केले. संस्था सचिव एकनाथ केसरकर यांनी सर्वांचे स्वागत करुन वाचनालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. शिरसाट यांनी मुलांना अभिनयासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी संचालक शाम पावसकर, दादा कोरगावकर, सदाशिव पाटील, विजय केसरकर आदी उपस्थित होते.