
साखरपा-रस्त्याने घेतला मोकळा श्वास
साखरपा आरोग्य केंद्राकडे
जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण
साखरपा, ता. २२ः संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेले कित्येक दिवस हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता; मात्र आता या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरवात झाली असून त्या अनुषंगाने रस्त्याच्या कडेला असणारे खोके हटवण्यात आले आहेत. अनेक दिवसांनी का होईना खोके हटवल्याने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असल्याने रस्ता रुंद झाल्याने दवाखान्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा दूर झाला आहे; मात्र भविष्यात पुन्हा या ठिकाणी खोके उभे राहणार नाही याची दक्षता संबंधित खात्याने घ्यावी, अशी विनंती नागरिकांकडून होत आहे.