संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान २ साठी, संक्षिप्त


काव्यवाचन स्पर्धेत वेदांत गुरव प्रथम
गुहागर ः मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमानिमित्त गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात पाटपन्हाळे विद्यालय व भावार्थ ग्रंथालय चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच काव्यवाचन स्पर्धा मुख्याध्यापक एम. ए. थरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार प़डली. या स्पर्धेत वेदांत गुरव या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक संपादन केला. हर्षदा पालकर हिने द्वितीय, मृण्मयी जाधव हिने तृतीय क्रमांक, तसेच आसमा शेख व सिद्धी तांबे या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धा झाली. स्पर्धेतील बहुसंख्य सहभागी विद्यार्थ्यांनी कवी राजा बढे , बालकवी, सुरेश भट, गुरू ठाकूर, शांता शेळके आदी नामवंत कवी व कवयित्रींच्या कविता उत्तमप्रकारे सादर केल्या. भावार्थ ग्रंथालय चिपळूणतर्फे काव्यवाचन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, शालोपयोगी वस्तू, भेटवस्तू व गुलाबपुष्प या स्वरूपात व उत्तेजनार्थ क्रमांक संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देण्यात आले.