व्यवसाय मेळाव्यात विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यवसाय मेळाव्यात विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे
व्यवसाय मेळाव्यात विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे

व्यवसाय मेळाव्यात विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे

sakal_logo
By

-rat२१p१२.jpg-
77522
कशेळी (ता. राजापूर)ः कशेळी शाळेतील व्यवसाय मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर खरेदी करताना पालक.
------------
व्यवसाय मेळाव्यात विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे
कशेळी प्राथमिक शाळा ; विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांचा सहभाग
पावस, ता. २२ः राजापूर तालुक्यातील कशेळी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी स्‍वतः उद्योग उभारून विक्री केली व या व्‍यावसायिकाकडून ग्रामस्‍थ, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी वस्‍तू विकत घेतल्‍या. व्‍यवसायासाठी पैसा उभारणे, विक्री कौशल्‍य याचे ज्ञान प्रात्‍यक्षिकातून मिळवले. प्रवीण किणे यांनी बालवयातच व्‍यवसाय साक्षर होणे आवश्यक असल्‍याचे याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी व्‍यवसाय मेळाव्याप्रसंगी मुख्याध्यापक शिवराम किनरे, शिक्षिका वृषाली राऊत व व्‍यवस्‍थापन मंडळ अध्यक्ष व २५० पालकांनी व ग्रामस्‍थांनी सहभाग नोंदवला. या वेळी १२ दुकानांच्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्‍वतः भाजीपाला, सूप, न्‍यूडल्‍स, कोबी मंच्युरियन, खेळणी, सरबत, गुलाबजामून, अनेक खाण्याचे पदार्थ व गरजेच्‍या वस्‍तू, गजरे, वडे, चॉकलेट, फुगे आदी भागीदारी व स्‍वतः खाऊच्‍या पैशाच्‍या माध्यमातून पैसे उभारून प्रत्‍येकी २०० ते ५०० रुपये नफा कमवला. शिक्षणामध्ये अशा प्रकारच्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज असून शालेय शिक्षणात व्‍यवसाय शिक्षण अंतर्भूत असणे काळाची गरज बनली आहे. या उपक्रमाचे पंचक्रोशीत चर्चा व अभिनंदन करण्यात आले.