खेड-चिमुकल्यांनी साकारल्या विविध रंगछटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-चिमुकल्यांनी साकारल्या विविध रंगछटा
खेड-चिमुकल्यांनी साकारल्या विविध रंगछटा

खेड-चिमुकल्यांनी साकारल्या विविध रंगछटा

sakal_logo
By

चिमुकल्यांनी साकारल्या विविध रंगछटा
‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा : शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
खेड, ता. 22 : सकाळ माध्यम समूहाच्या चित्रकला स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. रंगाच्या दुनियेत हरवून जात छोट्या चिमुकल्यांनी विविध रंगछटा साकारल्या. सकाळच्या सत्रात पाचवी ते दहावीपर्यंतच्या तर दुसर्‍या सत्रात पहिली ते चौथीपर्यंतचे तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. छोट्या बालदोस्तांबरोबर पालकांचाही उत्साह होता. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये वेळेत बसविण्यासाठीही श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलच्या केंद्रावर झुंबड उडालेली होती.
खेड तालुक्यातील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलच्या केंद्रावर तालुक्यातील आठ शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले. फिश टँकमधील मासे, ऑनलाईन शाळा, बागेतील दृष्य, लस घेणारा मुलगा, क्रिकेटचा सामना या विषयांवर चित्र रेखाटण्यावर भर होता. छोट्या गटात पहिली ते चौथीच्या बालदोस्त सहभागी झाले होते. चित्र काढण्याची संधी मिळणार असल्याने पालकांना घेऊन छोटे बालदोस्त वेळपूर्वीच उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये बसवून देण्यासाठी पालकही होतेच. स्केचपेन, खडू यासह पाण्यातून वापरलेले जाणारे रंग घेऊन बालदोस्तांनी केंद्रांवर हजेरी लावली. प्रश्‍नपत्रिका हाती पडताच लगेचच विद्यार्थ्यांनी पेन्सिल, पट्टी घेऊन चित्र रेखटण्यास आरंभ केला. लहान गटामध्ये सर्वाधिक चित्र ही वाढदिवसाचा केक या विषयावर काढण्यात आली. चित्रकला स्पर्धेसाठी श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूलचे शिक्षक राकेश देवरुखकर, लतिका दांडेकर, रुची जाधव , अपर्णा कदम, रोटरीच्या शुभम जड्याळ यांनी विशेष योगदान दिले.
-------
चौकट
विद्यार्थ्यांसाठी उपयोगी उपक्रम
लहानग्यांनसाठी चित्रकला स्पर्धा सकाळ माध्यम समूहाचा एक स्तुत्य उपक्रम आहे. सकाळचे दैनिक आमच्या घरी रोजच येते. त्यामुळे आम्हाला सकाळच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध उपक्रमा संदर्भात माहिती मिळत असते. विद्यार्थ्यांसाठी मात्र असे विविध उपक्रम सकाळ समूहाकडून नेहमीच व्हावेत अशी प्रतिक्रिया खेड येथील अभिजित शिरगावकर यांनी दिली.