खेड ः एसटी कामगारांना मोफत प्रवास द्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः एसटी कामगारांना मोफत प्रवास द्यावा
खेड ः एसटी कामगारांना मोफत प्रवास द्यावा

खेड ः एसटी कामगारांना मोफत प्रवास द्यावा

sakal_logo
By

-rat२२p३१.jpg-
७७५०३
खेड ः दहा वर्ष सुरक्षित सेवा देणारे चालक आमिर अत्तार यांचा सत्कार करताना केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश बावा.
-----------------
एसटी कामगारांना मोफत प्रवास द्यावा
संदीप शिंदे ; खेडला एसटी कामगार संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार
खेड, ता. २२ः आयुष्यभर लालपरीची सेवा करणारे चालक वाहक यांत्रिक व इतर विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या एसटी कर्मचारी आणि त्यांची पत्नी यांना अमृत महोत्सव योजनेप्रमाणे लालपरीच्या सर्वच गाड्यातून शेवटचा श्वास असेपर्यंत मोफत प्रवास मिळाला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.
खेड येथील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या गुणवंत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सत्कार समारंभावेळी बोलत होते. या वेळी केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश बावा, विभागीय अध्यक्ष राजेश मयेकर, विभागीय सचिव रवी लवेकर, ठाण्याचे विभागीय अध्यक्ष मुकुंद मोरे, संदेश सावंत, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक वनकुद्रे, स्थानकप्रमुख नंदकुमार जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे दीपक बागडे उपस्थित होते.
संदीप शिंदे म्हणाले, राज्य सरकारने राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवासाची घोषणा केली. त्यासाठी अमृत ज्येष्ठ नागरिक ही योजना आणली. त्याच धर्तीवर ज्या लालपरीची अविरतपणे सेवा केली, तिची पूजा केली त्या आमच्या कामगारांना नोकरीत असताना रजा मिळत नाही. त्यामुळे कुटुंबासोबत फिरता येत नव्हते. आता सेवानिवृत्तीनंतर मिळणारा पास हा फक्त सहा महिन्याचा असल्याने हा लालपरीच्या सेवकांवर अन्याय आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरच लालपरीच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवासाची योजना आणावी यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पाठपुरावा करेल.
-------------
चौकट
सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार

या वेळी २५ वर्ष सुरक्षित सेवा देणारे चालक मनोज परकर, २० वर्ष सुरक्षित सेवा देणारे विनोद सावंत, १५ वर्ष सुरक्षित सेवा देणारे केशव आण्णा भिंगार्डे, १० वर्ष सुरक्षित सेवा देणारे अमीर अब्बास अत्तार यांचा सत्कार करण्यात आला. २०२० ते २०२२ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.