Thur, Feb 9, 2023

पावस-पावस प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
पावस-पावस प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
Published on : 22 January 2023, 2:02 am
पावस प्रीमियर लिगचे उदघाटन
पावस, ता. २२ ः गेली आठ वर्ष पावस परिसरातील क्रिकेटप्रेमींना एक चांगला मंच तयार करून देणाऱ्या पावस प्रीमियर लीग स्पर्धेला पावस येथील शारजा क्रिकेट ग्राउंडवर स्पर्धेला सुरवात झाली. २९ जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते पाच या वेळेत साखळी पद्धतीने स्पर्धा खेळवली जाणार आहे. पावस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पावसच्या सरपंच चेतना सामंत नाखरे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपसरपंच विजय चव्हाण, स्पर्धेचे संयोजक सचिन भाटकर, नंदू भाटकर, पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे अवधूत सुर्वे, श्री. मुरकर उपस्थित होते.