मार्गताम्हाणेत धावले 2 हजार स्पर्धक

मार्गताम्हाणेत धावले 2 हजार स्पर्धक

rat२२३४.aci

(पान ५ साठी)

फोटो ओळी
-ratchl२२१०.jpg-
७७५३४
चिपळूण ः मार्गताम्हाणे येथील मॅरेथॉन स्पर्धेत धावताना खेळाडू.
---
मार्गताम्हाणेत धावले दोन हजार स्पर्धक

मॅरेथॉन स्पर्धा ; ‘एक धाव देशासाठी’ची हाक ; चिपळूण, गुहागरमधून सर्वाधिक प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. २३ ः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या शारीरिक, मानसिक विकासासाठी विविधांगी उपक्रम घेणाऱ्या मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीने एक धाव देशासाठी एशी हाक देत रविवारी (ता. २२) तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मार्गताम्हाणे, गुहागर व चिपळूण परिसरातील १८५० स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत १८ वर्षावरील १० किमीमध्ये मुलींच्या गटात सावर्डेतील साक्षी जड्याळ व मुलांच्या गटात सावर्डेतील स्वराज जोशी यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला.

एकूण पाच वयोगटात ही मॅरेर्थान स्पर्धा घेण्यात आली. सकाळी ८.३० वाजता संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण व संचालकांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरवात केली. ५० मीटरच्या प्राथमिक गटात प्रथम भूमी सकपाळ, द्वितीय श्रेहान दळवी, तृतीय अर्णव कदम (वसंतराव भागवत प्राथमिक शाळा), विशेष प्राविण्य अयांश अनिकेत चव्हाण (नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण). १० वर्षाखालील वयोगटात २ किमी मुलींमध्ये प्रथम- गार्गी चव्हाण (भागवत विद्यालय, मार्गताम्हने), द्वितीय ईश्वरी अग्रे (मुंढर प्राथमिक शाळा), तृतीय कृतिका निकम (दलवाई हायस्कूल, मिरजोळी). मुलांमध्ये प्रथम- साई सकपाळ, द्वितीय- श्लोक वाडकर (पी एन के शाळा,मार्गताम्हने), तृतीय विघ्नेश कदम (दलवाई हायस्कूल, मिरजोळी). १४ वर्षाखालील पाच किमी मुलींमध्ये प्रथम- हुमेरा सय्यद (शिवरत्न अॅकॅडमी, डेरवण), द्वितीय अनुजा पवार (शिवरत्न अॅकॅडमी, डेरवण) व तृतीय प्रीती पंडित (भागवत विद्यालय), तर मुलांमध्ये प्रथम- सोहम वाघे (रामपूर हायस्कूल), द्वितीय वीर मेटकर (कळंबस्ते हायस्कूल), तृतीय अथर्व दवंडे (न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी).

१८ वर्षाखालील ७ किमी मुलींमध्ये प्रथम- सिद्धी इंगवले (गुरुकुल कॉलेज), द्वितीय आदिती साळवी (डीबीजे कॉलेज), तृतीय चंदना साळुंखे (डीबीजे), मुलांमध्ये प्रथम- साहिल वेलांडे (कमलाबाई वामन पेठे हायस्कूल), द्वितीय- श्रेयस ओकटे (सावर्डे हायस्कूल), तृतीय- पारस गुरव (गुहागर कॉलेज), १८ वर्षावरील १० किमी- द्वितीय- सिद्धी शिर्के (शृंगारतळी कॉलेज), तृतीय- तृप्ती आगीवले (शृंगारतळी कॉलेज), मुलांमध्ये द्वितीय- अनिकेत चांदिवडे, तृतीय- ओंकार चांदिवडे (दोघेही डीबीजे कॉलेज). या वेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, उद्योजक वसंत उदेग, राजीव कानडे, प्राचार्या डॉ. राजश्री कदम, मुख्याध्यापक भाऊ लकेश्री, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com