‘सहकार समृद्धी’मधून साटम यांची माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सहकार समृद्धी’मधून
साटम यांची माघार
‘सहकार समृद्धी’मधून साटम यांची माघार

‘सहकार समृद्धी’मधून साटम यांची माघार

sakal_logo
By

‘सहकार समृद्धी’मधून
साटम यांची माघार

देवगड अर्बन निवडणूक ः मतदान न करण्याचे आवाहन

देवगड, ता. २२ ः येथील देवगड अर्बन को -ऑप. बँक निवडणुकीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत असलेल्या ‘सहकार समृद्धी पॅनेल’ मधील काँग्रेसच्या सुगंधा साटम यांनी निवडणुकीतून माघार घेऊन प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास वेळेअभावी विलंब झाल्याने मतपत्रिकेवर नाव येणार असले तरी आपल्याला मतदान करू नये, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी मतदारांना केले आहे.
येथील अर्बन को -ऑप. बँकेमध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत ‘सहकार समृध्दी पॅनेल’ रिंगणात उतरवले असल्याचे दोन्ही पक्षातर्फे संयुक्तपणे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पॅनेलमधील काँग्रेसच्या साटम यांनी निवडणूकीतूनच माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मी सुगंधा साटम (शिरगाव) आपणास कळवू इच्छिते, अर्बन बँक निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युती असलेल्या ‘सहकार समृध्दी’ पॅनेलमधून काँग्रेस पक्षामधुन उमेदवारी अर्ज भरला होता. महिला मतदार संघातून सहकाराची निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. निवडणूक लढवून बँकेला खर्चात घालणे योग्य वाटत नव्हते. सहकार क्षेत्रातील संस्था टिकवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे मला चांगलेच माहित आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, असे माझे मत होते. तसे होत नसेल तर माघार घेण्याचे ठरवले होते. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण, ते काय शक्य होईना असे वाटले. तेव्हाच मी माझा अर्ज मागे घेण्यास गेले. पण, उशीर झाल्याने अर्ज मागे घेता आला नाही. त्यामुळे अर्बन बँक निवडणुकीतील मतदारांनी माझे नाव महिला मतपत्रिकेवर असेल तरी मला मतदान करू नये. मी कमी वेळेत सर्व मतदारांपर्यंत प्रकृती अभावी पोहचू शकत नाही. त्यामुळे आपल्याला मतदान करू नये, असे आवाहन केले आहे.