
जनजागृती
rat२३१०.txt
(टुडे पान २ साठी)
प्लास्टिक व्यवस्थापन जनजागृती
रत्नागिरी ः भारत शिक्षणमंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयात आयक्युएसी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक व्यवस्थापन जनजागृती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक आदित्य लोंढे, एक क्षण आनंदाचा फाउंडेशनचे संचालक अक्षय भोईटे उपस्थित होते. लोंढे यांनी प्लास्टिकचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती दिली. भोईटे यांनी प्लास्टिक ब्रिक्स म्हणजे काय व त्या कशा तयार कराव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. प्लास्टिकचे निसर्गावर होणारे परिणाम याबद्दल माहिती दिली. या वेळी प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख ऋतुजा भोवड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
---
एमइएस कॉलेजतर्फे रस्ता सुरक्षा कार्यक्रम
लोटे ः केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करते. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या विषयीची जागृती निर्माण व्हावी यासाठी एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग, रोट्रॅक्ट क्लब लोटे व वाहतूक उपकेंद्र लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य अभिजित कळंबटे यांनी रोट्रॅक्ट क्लबच्या निरनिराळ्या उपक्रमांविषयी माहिती दिली. सुभाष रहाटे कर्मचारी वाहतूक उपकेंद्र लोटे यांनी वाहतुकीचे नियम व हेल्मेटचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत सुरक्षित प्रवास हा सर्वांसाठी कसा महत्वाचा आहे ते सांगितले. वाहतूक उपकेंद्र लोटेचे कर्मचारी बळीराम शिंदे, विजयकुमार राठोड, पप्पू कदम, संजय उकर्डे, संतोष कदम यांनी प्रात्यक्षिकांसह गाडीचा वेग कसा असावा, तो ठराविक पातळीच्या बाहेर गेल्यास कशाप्रकारे दंड भरावा लागतो. त्याचप्रमाणे वाहतुकीचे निरनिराळे नियम कसे पाळावेत. वाहन चालवताना आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक आहेत, या सर्वांची माहिती सांगितली.
---