शिष्यवृत्ती सराव परीक्षेस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती सराव परीक्षेस प्रतिसाद
शिष्यवृत्ती सराव परीक्षेस प्रतिसाद

शिष्यवृत्ती सराव परीक्षेस प्रतिसाद

sakal_logo
By

शिष्यवृत्ती सराव परीक्षेस प्रतिसाद
कणकवली ः परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळातर्फे रविवारी कणकवली व सावंतवाडी या केंद्रांवर जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. ८३१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. कणकवली केंद्रावरील सराव परीक्षा क़णकवली कॉलेजमध्ये घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन पुणे येथील सद्गुरू माऊली महाराज व भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, संस्थानचे विश्वस्त मुरलीधर नाईक, प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले, पुण्यातील उद्योजक सोमनाथ खेडेकर, प्रा. दिवाकर मुरकर, विजय केळुसकर, गजानन उपरकर, काशिनाथ कसालकर, श्रीकृष्ण कांबळी, विष्णू सुतार, मंगेश तेली, सदानंद गावकर, शरद हिंदळेकर उपस्थित होते. सावंतवाडीत परीक्षा कळसुलकर हायस्कूलमध्ये झाली. त्याचे उद्‍घाटन संस्थानचे खजिनदार दादा नार्वेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वस्त प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.
-------------
हुमरमळात विविध कार्यक्रमांचे आयोजन
कुडाळ ः हुमरमळा-अणाव येथील श्री देव चव्हाटेश्वर मंदिरात २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. २६ ला दुपारी बाराला घटस्थापना, रात्री ग्रामस्थांची भजने, २७ ला रात्री भजने, २८ ला रात्री अठरा वर्षांखालील गटातील भजन स्पर्धा (वर्ष अकरावे), रात्री बाराला पारितोषिक वितरण, २९ व ३० ला जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, पारितोषिक वितरण, ३१ ला रात्री आठला विठ्ठल परब (मुंबई) यांचे भजन, नऊला नागेश परब (राधानगरी) यांचा ‘स्वामीगंध’ हा अभंग व भक्तिगीतांचा कार्यक्रम, अकराला जिल्ह्यातील भजने, १ ला भजने, दिंडी भजन, रात्री साडेदहाला राजापूर येथील हनुमान दिवटेवाडी पवार मंडळाच्या ढोलपथकाससह चित्ररथ गावदिंडी, २ ला सकाळी गोपाळकाला, दुपारी महाप्रसाद, लहान मुलांच्या स्पर्धा, रात्री अकराला पारितोषिक वितरण व रात्री बाराला वालावकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.
--
शिरगावात विविध धार्मिक कार्यक्रम
कणकवली ः शिरगाव बाजारपेठेतील ओम गणेश मंदिराचा वर्धापन दिन व माघी गणेश जयंतीनिमित्त २४ व २५ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २४ ला सकाळी आठला श्रींची महापूजा, अभिषेक, सहस्त्रदुर्वा अर्पण, साडेनऊला स्तोत्रपठण, साडेदहाला आरती, तीर्थप्रसाद, अकराला शालेय चित्रकला स्पर्धा, दुपारी तीनपासून स्थानिक भजने, रात्री नऊला नादसंगीत विद्यालय, शिरगावच्या विद्यार्थ्यांचा ‘नादसंध्या’ हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. २५ ला सकाळी सातला महापूजा, अभिषेक, नऊला स्तोत्रपठण, अकराला गुरुदास केळुसकर महाराज यांचे कीर्तन, दुपारी एकला महाप्रसाद, तीनला स्थानिक भजने, सायंकाळी पाचला हरिपाठ, साडेसातला श्रींची महाआरती, रात्री आठला रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे.