
रस्ता सुरक्षेचे नियम पाळून जीवन अनमोल बनवा
rat२३२३.txt
(टुडे पान २ साठी)
रस्ता सुरक्षेचे नियम पाळा...
यासीन मुल्ला ; खापणे महाविद्यालयात सुरक्षा अभियान
पावस, ता. २३ ः अपघात सांगून होत नाहीत, तर ते अचानक घडतात. त्यासाठी चालक, वाहक, रस्ता हे सारे जबाबदार आहेत. सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. म्हणूनच रस्ता सुरक्षेचे नियम पाळून जीवन अनमोल बनवूया, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरीचे आरटीओ निरीक्षक यासीन मुल्ला यांनी केले.
राजापूर तालुक्यातील पाचल येथील खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, आरटीओ इन्स्पेक्टर सोहेल ओव्हळ, मोटार ट्रेनिंग स्कूल पनवेल विभागाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, श्री साई मोटार ट्रेनिंग स्कूलच्या संचालिका पूजा सिगम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. व्ही. एस. पाटील आदी उपस्थित होते.
हेल्मेट, सीट बेल्ट या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रस्त्याच्या कडेला लावलेले वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोनातील चिन्हे ही रस्ता सुरक्षा अभियानातील महत्त्वाची चिन्हे आहेत. सिग्नलवर असणारे पिवळा, हिरवा आणि लाल रंग आपणाला विशिष्ट संकेत देत असतो. या सर्व गोष्टींची माहिती घेऊन आपण ते अंमलात आणून रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करूया, असे आवाहन आरटीओ इन्स्पेक्टर सोहेल ओव्हळ यांनी केले.
-