लांजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 25 पासून माघी उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 25 पासून माघी उत्सव
लांजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 25 पासून माघी उत्सव

लांजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 25 पासून माघी उत्सव

sakal_logo
By

लांजात २५ पासून
माघी उत्सव
लांजा, ता. २३ः येथील सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळातर्फे राजा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाला २५ जानेवारीपासून सुरवात होणार आहे. या निमित्ताने दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या उत्सवांतर्गत मंगळवारी (ता. २४) जानेवारीला सायंकाळी वारकरी दिंडीच्या संपूर्ण सक्रिय सहभागातून श्रींचे जोरदार आगमन होणार आहे. २५ ला सायंकाळी ऑर्केस्ट्रा स्वरगंध हा कार्यक्रम होणार असून तत्पूर्वी रात्री ८.३० वा. मुदोबा भजन मंडळ केळंबे यांचे भजन होणार आहे. २६ला रात्री अचानक मित्रमंडळ केळंबेचे भजन आणि त्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. २७ ला रात्री भजन आणि त्यानंतर लग्नाआधी वरात हे नाटक होईल. २८ ला राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे शिष्य संदीप मांडके बुवा यांचे नारदीय कीर्तन, २९ ला नारदीय कीर्तन होणार आहे. ३० ला सायंकाळी ५ वा. भजन होणार असून रात्री जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होणार आहेत.
३१ ला श्री सत्यविनायक पूजा आणि रात्री जिल्हास्तरीय संगीतभजन होणार आहे. १ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वा. विश्व हिंदू परिषद महिला सत्संग आणि रात्री ८ वा. भजन, त्यानंतर रात्री शाळा नं. ५ चे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतील. २ ला भजन आणि त्यानंतर रात्री रामरावण नृत्य स्पर्धा होणार आहेत. ३ ला दुपारी एक ते तीन या वेळेत श्रींचा महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर रात्री लोकसंस्कृतीचा मराठमोळा लोक कलाविष्कार सादर केला जाणार आहे. ४ ला दुपारी दोन ते तीन उत्तरपूजा व आरती आणि त्यानंतर श्रींचे मिरवणुकीने विसर्जन केले जाणार आहे.