नारळ उत्पादनातून शाश्वत रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारळ उत्पादनातून शाश्वत रोजगार
नारळ उत्पादनातून शाश्वत रोजगार

नारळ उत्पादनातून शाश्वत रोजगार

sakal_logo
By

77698
वेंगुर्ले ः गटविकास अधिकारी मोहन भोई यांचा नारळाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी एम. के. गावडे, प्रज्ञा परब आदी.

नारळ उत्पादनातून शाश्वत रोजगार

एम. के. गावडे ः वेंगुर्लेत नारळमित्र प्रशिक्षणाचे उद्‍घाटन

वेंगुर्ले, ता. २३ ः नारळ पीक आज शाश्वत आहे. संपूर्ण कोकण नारळशेतीसाठी पूरक असून काही जुन्या संकल्पना मोडीत काढून शेतकऱ्यांनी नारळ शेती व्यावसायिकरित्या करावी. बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी तसेच तरुण-तरुणींनी नारळ शेती, प्रक्रिया उद्योगांकडे वळून स्वतःची आर्थिक उन्नती साधावी. यासाठी लवकरच भव्य कृषी मेळावा आयोजित करणार असल्याचे कृषिभूषण तथा एम. के. कॉयर क्लस्टर अध्यक्ष एम. के. गावडे यांनी सांगितले.
नारळ विकास बोर्ड राज्य केंद्र, ठाणे व महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आयोजित नारळमित्र प्रशिक्षणाच्या उद्‍घाटन कार्यक्रमावेळी गावडे बोलत होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी नारळ बोर्डाचे रिजनल मॅनेजर शरद आगलावे, खरेदी-विक्री संघाच्या व्हाईस चेअरमन प्रज्ञा परब, तज्ज्ञ प्रशिक्षक रुपेश तांबडे, अश्विनी पाटील, अरुणा परब, वृषाली चिककर यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या प्रशिक्षणात कोणकोणत्या नारळ जाती किती व कशा लावायच्या, नारळाच्या झाडांवर येणाऱ्या रोगांचे निर्मूलन, अधिक पीक असे घ्यायचे याची माहिती तसेच नारळाच्या झाडावर चढायचे सर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रशिक्षणात शिकवली जाणारी सर्व माहितीची एक पुस्तिका दिली जणार आहे. प्रशिक्षण घेतल्यांना नारळाच्या झाडावर चढायची शिडी मोफत दिली जाईल, असे यावेळी प्रज्ञा परब यांनी सांगितले.