
बांदा-गणेशनगरला गणेश जयंती
77692
श्री गणेश मूर्ती
बांदा-गणेशनगरला गणेश जयंती
बांदा ः बांदा-वाफोली मार्गावर गणेशनगर येथे असलेल्या श्री गणेश मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. सर्व भक्तगणांना सुख, समृद्धी व चांगले आरोग्य लाभावे, यासाठी मंगळवारी (ता. २४) सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान ‘गणेशयाग’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. २५) माघी गणेश जयंती सोहळा पहाटे आरंभ होईल. यानिमित्त दिवसभर विविध व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये पहाटे पाचला काकड आरती, अभिषेक व पूजा, सकाळी नऊला श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी बाराला गणेश जन्म सोहळा, दुपारी एक ते तीन दरम्यान महाप्रसाद, सायंकाळी विविध भजनांचा कार्यक्रम, रात्री नऊला अष्टविनायक दशावतारी नाट्यमंडळ, निरवडे यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘माहेरवाशिणी आई भवानी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
................
कुडाळ पेन्शनर्सची शनिवारी सभा
सिंधुदुर्गनगरी ः कुडाळ तालुका पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ ला सकाळी अकराला कुडाळ येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज सभागृह येथे आयोजित केली आहे. या सभेस सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ तालुका पेन्शन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक रासम व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.