एका नीलेशला मृत्यूने गाठले दुसरा बचावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका नीलेशला मृत्यूने गाठले दुसरा बचावला
एका नीलेशला मृत्यूने गाठले दुसरा बचावला

एका नीलेशला मृत्यूने गाठले दुसरा बचावला

sakal_logo
By

rat२२२०F.txt

(टुडे पान २ साठी)

एका नीलेशना मृत्यूने गाठले दुसरा बचावला

माणगावनजीकचा अपघात ; कुटुंबातील कर्ता तरूण

गुहागर, ता. २३ : मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (ता.१९) पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये दहा लोकांनी आपला जीव गमावला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रेपोली गावानजीक एका ट्रकने समोरून येणाऱ्या मोटारीला धडक दिली. हेदवीचा रहिवासी, गावकऱ्यांसाठी नेहमीच धावपळ करणारा आणि उत्तम चालक नीलेश शशिकांत जाधव आपल्या गावी येतानाच मृत्युमखी पडले. गावातील आणखी एक नीलेश मात्र मोटारीने न येता खासगी बसने आल्यामुळे बचावला.

मुंबई गोवा महामार्गावरती गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी काहीजण गुहागरच्या हेदवी गावातील होते. त्यामुळे अपघाताची बातमी येताच हेदवी गावावर शोककळा पसरली. गुरुवारी रात्री १० वाजता सहा जणांवर हेदवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील एका वाहन चालकाचा बळी गेला आहे. नीलेश शशिकांत जाधव मुंबईमध्ये वाहन चालकाची नोकरी करायचे. नीलेश हे गाडीचे भाडे घेऊन मुंबईला गेले होते. तिथून परत येत असताना हेदवी गावातील जाधव, डावखोतमधील पंडित कुटुंबीयांसह आणखी काही लोक त्याच्या गाडीत होते. परंतु, गावी परतत असताना या सगळ्यांना वाटेतच मृत्यूने गाठले.

नीलेश जाधव हेदवी गावातील जुळेवाडी येथे राहत होते. या अपघातामुळे जाधव कुटुंबातील एकुलता एक मुलगा हिरावला गेला आहे. नीलेशचे वडील गवंडी काम करतात. त्याच्या पश्चात आई-वडील व छोटी बहीण असा परिवार आहे. चालक म्हणून गावातल्या अनेकांना उपयोगी पडत होते. हेदवी येथील हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले होते. गेल्यावर्षी गणपतीच्यावेळी ते मुंबईहून गावी परतला होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी गावात टेम्पोचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु, हा व्यवसाय फारसा न चालल्यामुळे काही दिवसांपूर्वीच मुंबईला परत गेले होते. हे कुटुंब आजी शेवंती सखाराम जाधव यांच्या वर्षश्राद्धसाठी हेदवी येथे येत होते. अपघातात हेदवी, सावंतवाडी आणि डावखोतमधील एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.

आमदार जाधवांनी केले सांत्वन

माणगावजवळ गुरुवारी (ता. १९) पहाटे झालेल्या भीषण अपघातात गुहागर तालुक्यातील हेदवी येथील दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबाला शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी हेदवी येथे जाऊन भेट दिली व त्यांचे सांत्वन केले. कमावत्या व्यक्तींचा अपघातात मृत्यू झाल्याने या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, सरपंच मोरे, उपसरपंच महादेव वणे आदी उपस्थित होते.